Child Development
By Vaidya Harish Patankar502 185 0
लहान मुलांना बुद्धी स्मृति वर्धनासाठी काही उपाय आहेत का?
उत्तर- हो, लहान मुलांचे वय वाढीचे असते. लहान वयातच बुद्धीचा विकास चांगला होतो. लहान मुलांची ग्रहणशक्ती फार असते, त्यामुळे या वयातच त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. मुलांच्या बुद्धीचे परीक्षण पण करून घ्यावे, म्हणजेच आकलन शक्ती, ग्रहण शक्ती, कल्पना शक्ती, स्मरणशक्ती, मेधा शक्ती, वक्तृत्व शक्ती या सर्व ज्ञान घेण्याच्या, साठविण्याच्या, कल्पनेने वापरण्याच्या वा व्यक्त करण्याचा शक्ती आहेत. या सर्वांचाच विकास होणे गरजेचे आहे. आयुर्वेदात बुद्धी, सिद्धी, स्मृति, मेधा, धृती, कीर्ती, क्षमा , दया या अष्ट ज्ञान देवता सांगितल्या आहेत. त्या सर्वांचेच विद्यार्थ्यांच्या शरीरात शक्तीस्वरूप असणे गरजेचे आहे. क्षमा आणि दया सुद्धा, जसे विद्या विनयेन शोभते. मुलांची बुद्धी स्मृति वाढविण्यासाठी त्यांना रोज सकाळी लवकर उठून पाठांतराची सवय लावा. लवकर उठून सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम, ध्यान धारणा करायला शिकवा. रोज काहीतरी चिंतन, मनन, लेखन करायला सांगा. ते इतरांना सांगायला लावा किंवा तुम्ही ऐका. त्यांची कीर्तन शक्ती म्हणजेच वक्तृत्व शक्ती चा पण विकास होऊ द्या. त्यांना कृतीतून शिकू द्या म्हणजे ते विसरणार नाहीत. त्यांना पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने अभ्यास करायची सवय लावा. शब्द, स्पर्श, रूप, रस , गंध हे इंद्रिय विषय त्या त्या इंद्रियांच्या साहाय्याने घेऊनच कोणत्याही विषयाचे ज्ञान त्याचे पांचभौतिक कसे होईल याकडे लक्ष द्या. आहारात रोज रात्री भिजवलेले दोन बदाम, खोबरे, मनुके, अक्रोड असे बुद्धिवर्धक सुका मेवा किमान ठेवा. दूध, तूप सुद्धा मेधाग्नी वाढवून आकलन शक्ती वाढवितात. शिवाय आयुर्वेदात सांगितलेले अनेक उपचार आपल्या पाल्याच्या गरजेनुसार सुरू करा. जसे की पंचकर्म, शिरोधारा, शिरोपिचू हेही उत्तम स्थर्य प्राप्त करून मुलांना बुद्धी स्मृति वाढवायला मदत करतात. शिवाय आयुर्वेदात फार सुंदर गरजेनुसार औषध आहेत जसे की बुद्धी स्मृति वाढविण्याचे काम शंखपुष्पी, ब्राह्मी , यष्टीमधू करत असतात. सिद्धी वाढविण्याचे काम वचा म्हणजे वेखंड करत असते. तर धृती म्हणजे धारणशक्ती वाढविण्याचे काम बदाम, नारिकेल करत असतात. अक्कलकारा आपली वक्तृत्व म्हणजे कीर्तन शक्ती उत्तम करतो तर वेगवेगळ्या औषधात सिद्ध केलेली तूप / घृत सुद्धा उत्तम काम करतात. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना मानसिक खाद्य पण देत चला. म्हणजे ती अष्टपैलू बनतील.
Comments
Latest Posts
-
Urine......
( 2 years ago) -
Vaman, Virechan......
( 2 years ago)