Vaman, Virechan

By Vaidya Harish Patankar  
2537     196   0



1.वमन या पंचकर्मामुळे काय काय फायदा होतो?

उत्तर:- वमन हे कफ दोषावर करावयाचे एक महत्वाचे शोधन कर्म आहे. वमनामुळे शरीरातील विषारी पदार्थ उलटीद्वारे बाहेर काढली जातात. वमन केल्याने जुनाट सर्दी,अनेक त्वचारोग, शिराचे विविध व्याधी यामध्ये उपयुक आहेत. वमन कर्मामुळे हे पोटांच्या विविध तक्रारी सुद्धा कमी होतात. याचशिवाय स्वस्थ व्यक्तीसाठी आजार होऊ नयेत म्हणून सुद्धा वसंत ऋतू मध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारी मार्च मध्ये वमन कर्म उत्कृष्ट कार्य करते.

2.विरेचन पंचकर्मामुळे काय काय फायदे होतात??

उत्तर:- विरेचन कर्म हे पित्तदोषावरील एक शोधन कार्य आहे. या कर्मामध्ये शौचवाटे शरीर शुद्धी केली जाते. पित्तामुळे होणारे व्याधी जसे की भूक मंदावणे, वाढलेले वजन यामध्ये विरेचन फायदेशीर ठरते. केसांच्या समस्या जसे अकाली पांढरे केस,कोंडा, केसगळती यामध्ये विरेचन विशेष उपयुक्त आहे. पित्तामुळे झालेले त्वचारोग विरेचनाने बरे होतात. स्वस्थ रक्षण करण्यासाठी शरद ऋतू मध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात विरेचन करावे.



Share on

Like Now
Total Likes
196
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments