Burp, Vometing - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
758     302   0

1. सतत खूप ढेकर येतात, काय उपाय करावा?

उत्तर- सतत ढेकर येणे हा एक पचनशक्ती बिघडल्याचा आजार आहे. कित्त्येक रुग्णांना तर हात , पाय दाबले, गर्दीत गेले अंग दाबले गेले तरी ढेकर येतात. कदाचित मांसगत वात सारखी लक्षणे पण त्यांना असू शकतात. योग्य निदान करून उपचार घ्यावेत. साधारण भाजलेला हिंग व कोमट पाणी किंवा शेवग्याच्या मुळांच्या रसात दोन चिमूट भाजलेला हिंग टाकून दिल्यासही ढेकर कमी होतात. दिवसभर कोमट पाणी पिणे, थोडं उपवास करणे व रात्री झोपताना गंधर्व हरितकी किंवा एरंडेल तेल पिणे, मूग भात खिचडीच खाणे. तात्काळ आराम मिळतो.

2. सतत ओकारी आल्यासारखे वाटते, काय करावे?

उत्तर- सतत ओकारी आल्यासारखे वाटत असल्यास लवंग व जायपत्री द्यावी. किंवा लवंग दाताखाली धरून बसावे. काहींना दह्यामध्ये कमलाक्ष वाटून घ्यावे, ओकारी तात्काळ थांबते. आजार खूप जुना असल्यास जुन्या तुरटीची राख मधात द्यावी म्हणजे लवकर बरे वाटते.



Share on

Like Now
Total Likes
302
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments