Urine

By Vaidya Harish Patankar  
210     69   01. लघवी होत नसल्यास काय उपाय करावेत?

उत्तर- लघवी का होत नाहीये याचे कारण प्रथम शोधावे. फार काळ झाला नसल्यास व त्रास होत नसल्यास खालील काही घरगुती उपाय करून पाहावेत अन्यथा सरळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, दवाखान्यात जावे लघवी रबराची नळी टाकून मोकळी केली जाते. तोपर्यंत काही तात्पुरते उपाय सांगतो जसे की भीमसेनी कापूर पूड करून लघवीच्या जागेच्या म्हणजेच लिंगाच्या टोकाला लावावा, याने पाच मिनिटात लघवी सुरू होते. पाण्याचा नळ चालू ठेवून बाथरूम मध्ये बसावे व नाभी आणि ओटीपोटावर सतत पाण्याची धार चालू ठेवावी याने सुद्धा पटकन लघवी व्हायला मदत होते. बेंबीवर हिंग आणि एरंड तेल चोळून लावावे याने सुद्धा पटकन लघवी होते. धने जिरे चे पाणी पिल्यास देखील फायदा होतो. तसेच सीताफळाचे मूळ पाण्यात उगाळून पाणी प्यायल्यास बंद झालेली लघवी सुद्धा व्यवस्थित सुरू होते.Share on

Like Now
Total Likes
69
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code
Comments
No Comments