Brinjal - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
371     118   0



१. वांग्याची भाजी कोणी व कशी खावी?

उत्तर- वांगी ही मधुर, तीक्ष्ण , कटू विपकी, वायू व कफहारक, मसाले न घातल्यास पित्तप्रकोप न करणारी , अग्निदीपक, वीर्यवर्धक व बल्य आहेत. वांगी अनेक लोक कच्ची खातात, देठासह खातात, भाजी करून, वांग्याचे भरीत करून किंवा मसाल्याच्या साहाय्याने भरली वांगी करून खातात किंवा मिक्स भाजी मध्ये तुकडे करून एकत्र करून खातात. मोठे व जुने झालेले वांगे पचायला हलके व किंचित पित्त कारक असते. वांगी चवदार असतात मात्र त्यातील मसाले त्रासदायक ठरू शकतात. वांगी भाजून भरीत करून हिंग व तेल टाकून खाल्ल्यास अधिक रुचकर व पाचक होतात.

२. वांगी रोज खाऊ शकतो का?

उत्तर- हिवाळ्यात व पावसाळ्यात वांगी रोज सुद्धा खाऊ शकता मात्र उन्हाळ्यात वांगी रोज खाऊ नयेत. वांगी शीत ऋतूत बालदायक ठरतात मात्र उष्ण ऋतूत त्यातील पित्तकारक गुण उष्णता वाढवितात व त्रास होतो. मूळव्याध, पोटात आग, संडास च्या ठिकाणी दाह असे अनेक पित्तज विकार याने घडतात, त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी त्यांचे रोज सेवन करू नये.

३. कोणत्या आजारात वांगी जास्त उपयुक्त आहेत?

उत्तर- वांगी लघवीचे प्रमाण वाढवितात, त्यामुळे मुतखड्यात उपयोगी होतात, मात्र ही वांगी अधिक बिया असलेली नसावीत. वांग्याची भाजी पचनाच्या विकारात, प्लिहा रोगात, यकृताला बल्य व एकूणच रुचकर आणि पोषक असते. हिवाळ्यात बल वर्धक असते. ४. वांग्याची भाजी कोणी खाऊ नये? उत्तर- वांगी आरोग्यदायक असली तरी पित्त प्रकृतीच्या, उष्ण प्रकृतीच्या व मूळव्याध आणि आम्लपित्त असणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय ती उष्ण असल्याने उन्हाळ्यात ती जास्त खाऊ नयेत. स्त्रियांनी सुद्धा वांगी जास्त खाऊ नयेत, कारण स्त्रियांची प्रकृती सुद्धा उष्ण असते व त्यांना पाळीच्या तक्रारी याने वाढू शकतात. पुरुषांचे देखील वीर्य पातळ होते जर त्यांनी वांग्याचे अतिरिक्त सेवन केले तर. यातील मसाल्यामुळे ते अधिक दाहक व मूळव्याध कारक बनते.



Share on

Like Now
Total Likes
118
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments