Tamarind - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
279     106   0



1.चिंच खावी का? चिंचेचे काय फायदे होतात?

उत्तर- कोवळ्या चिंचा या अति आंबट मात्र रुचिकर असतात. अग्निदीपक व वात नाशक ही आहेत, मात्र पित्त वर्धक व रक्त दुष्टी करणाऱ्या आहेत. पक्व चिंचा मधुर रसात्मक, सारक , आंबट व हृद्य आहेत. चिंचा या आंबट गुणांच्या असल्याने आहारात अनेक भाज्या, पाणीपुरीचे पाणी तसेच आयुर्वेदात अनेक औषधांसाठी वापरल्या जातात. चिंचेचा पाला सुद्धा औषधी आहे. पूर्वी विंचू दंश झाल्यावर चिंचोका काढून त्याचा पंधरा भाग त्यावर चिकटवावा. तो विष शोषून घेऊन आपोआप खाली पडतो व वेदना ही कमी होतात. निवडुंगाच्या विषावर चिंचेचा पाला वाटून लेप करावा. चिंचेचे सार दाह व कफकारक असले तरी वातनाशक आहे, सोबत खडीसाखर घालून केल्यास दाह शांत होतो.1.



Share on

Like Now
Total Likes
106
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments