Jaggery - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
311     122   0



1. आहारात आजकाल साखरेऐवजी गुळ वापरायला सांगतात. नक्की काय फायदे होतात गुळ सेवन केल्यास?

उत्तर- साखरेपेक्षा गुळ कधीही श्रेष्ठच आहे. साखर बनवण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया असतात मात्र त्यामानाने गुळ नैसर्गिक पद्धतीने बनविता येतो. ऊसाच्या रसातील बरेच पाणी आटवून त्यापासून गुळ बनविला जातो. त्यामुळे यात ऊसातील सर्व क्षार व खनिजद्रव्ये टिकून राहतात. गुळाने थकवा लगेच कमी होतो. लहान मुले व स्त्रियांना थोड्याश्या श्रमानेही थकवा जाणवत असल्यास त्यांनी आहारात गुळाचे सेवन करावे. गुळ जसजसा जुना होत जाईल तसतसा तो अधिक शीतल होत जातो. औषधांना तर वीस वर्ष्याचा जुना गुळ देखील वापरला जातो. गुळामध्ये साखरेपेक्षा अधिक तेहतीस टक्के पोषक घटक असतात. गुळ वीर्यवर्धक, जड, स्निग्ध, वायुनाशक, गुणधर्म असतात. गुळ जास्त सेवन केल्यास मात्र कफवर्धक, मेदोवर्धक व कृमीवर्धक काम करतो. नवा गुळ सुद्धा कफ, श्वास, खोकला व कृमी वाढवितो. जुना गुळ अत्यंत आरोग्यदायी व हृदयाला हितकर असतो. काटा पायात लागला असता पूर्वी तेथे गुळाचा चटका दिला जात असे, यामुळे काटा अलगत बाहेर येत असे व दुखणं सुद्धा तात्काळ कमी होत असे.



Share on

Like Now
Total Likes
122
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments