Panchakarma

By Vaidya Harish Patankar  
328     137   0



1. पंचकर्म म्हणजे काय?

उत्तर- आयुर्वेदात आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी ज्या पाच विधी सांगितल्या आहेत त्यांना पंच कर्म असे म्हणतात. पंच म्हणजे पाच व कर्म म्हणजे विधी किंवा प्रोसेस. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण यांचा समावेश होतो. स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाज व स्टीम बाथ हा प्रत्येक कर्माच्या पूर्वी पूर्व कर्म म्हणून केलाच जातो. शरीर शुद्धीसाठी प्रकृती व ऋतु नुसार पंचकर्म केले जाते. जसे की वमन कर्म हे शरीरातील छाती च्या भागातील अनावश्यक वाढलेल्या कफाला उलटी च्या मार्गाने बाहेर काढते. हे कर्म साधारण उन्हाळ्यात म्हणजे वसंत ऋतूत केले जाते. विरेचन म्हणजे आपल्या शरीरातील मध्यम मार्गातील साधारण नाभी प्रदेशातील अनावश्यक वाढलेले पित्त जुलाबाच्या साहाय्याने खालील मार्गातून काढून टाकणे. हे कर्म साधारण हिवाळा च्या सुरवातीला म्हणजे शरद ऋतू मध्ये वैगेरे करतात. तर बस्ती म्हणजे शौचाच्या वाटे औषध देऊन आपल्या शरीरातील अधो मार्ग म्हणजे सर्व मोठ्या व छोट्या आतड्यातील अनावश्यक वाढलेला वात, मळ यांची शुद्धी करणे. ही एक अर्धी चिकित्साच आहे. शरीर शुद्धी झाली की अनेक आजार आपोआपच कमी होतात. ही चिकित्सा पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणजे साधारण वर्ष्या ऋतूमध्ये केली जाते. असे तीन ऋतूत महत्वाची तीन पंचकर्म केली जातात, तर उरलेली दोन्ही नस्य व रक्तमोक्षण आकाशात ढग नसताना केली जातात, यांना ऋतू चे बंधन नाही मात्र हे तात्काळ रक्त रक्त शुद्धी करू शकतात. पूर्ण नासा ही शिरसो द्वारम , म्हणजे नाक हे आपल्या शिराचे द्वार असल्याने व तिथेच आपल्या शरीराची मुळे असल्याने साक्षात मुळांवर आघात वा कर्म करून नस्य केल्याने तात्काळ लाभ मिळतो. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात पंचकर्म ही केलीच पाहिजेत. जसे निरोगी राहण्यासाठी ही पंचकर्म ऋतूनुसार केली जातात तसेच आजारी म्हणजेच रोगी माणसांना कोणत्याही ऋतुत कोणतेही कर्म आवश्यकतेनुसार वैद्याच्या सल्ल्याने दिले जाते. पंचकर्म ही एक उत्कृष्ट चिकित्सा पद्धती आहे. आता अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा याचे आकर्षण वाढेले आहे.

2. पंचकर्म कोण करू शकतो? आजार नसेल तरी पंचकर्म केले तर चालते का?

उत्तर-हो . पंचकर्म बळ कमी झालेले अबाल वृद्ध सोडून सर्वांजण करू शकतात. शरीर शुद्धी याचे प्रमुख हेतू असल्याने आजारी नसलेले लोक पण हे करू शकतात. आजारानुसार पण वेगवेगळे पंचकर्म करता येते. पूर्वी राजे लोक युद्धात हरलेल्या कैद्यांना आपल्या सैन्यात भरती करून घेण्यापूर्वी देखील त्यांची पंचकर्म करून शुद्धी करून घेत असत. आता अनेक लोक लग्नापूर्वी, अपत्य प्राप्ती पूर्वी, गर्भसंस्कार पूर्वी, किंवा वयाच्या काही टप्प्यांवर शरीर शुद्धी साठी पंचकर्म करून घेतात. त्यांना याचा खूप चांगला फायदा होतो.

3. पंचकर्म करताना फार पथ्य पाळावी लागतात का?

उत्तर- असे काही नाही. पंचकर्म करताना तुम्हाला हलके वाटावे, शरीरात लाघवत्व यावे व दोष बाहेर जावेत म्हणून काही पथ्य सांगितली जातात, ती पाळल्यास तुम्हालाच अजून छान वाटते व पंचकर्मचा पूर्ण लाभ पण मिळतो. ही खूप अवघड नक्कीच नाहीत. उलट यात पोटाला विश्रांती मिळत असल्याने एक शरीर शुद्धी चा वेगळाच आनंद मिळतो व मानसिक नियंत्रण पण वाढते.



Share on

Like Now
Total Likes
137
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments