Hair Care

By Vaidya Harish Patankar  
229     111   0



1. केसांसाठी प्लॅस्टिक कंगवा वापरावा की लाकडी?

उत्तर - प्लास्टिक आणि मेटलपासून तयार केल्या जाणाऱ्या कंगव्यांमध्ये पॉसिटीव्ह इलेक्ट्रिकल चार्ज असतो तर केसांमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे केसांसाठी अशा कंगव्यांचा वापर केला असता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होऊन त्याचे केसांवर हानिकारक परिणाम होतात. त्यामुळे केस कोरडे होणे, लवकर तुटणे, दुतोंडी केस निर्माण होणे अशा गोष्टी घडू शकतात. याउलट लाकडी कंगवा वापरला असता केसांवर असे परिणाम होत नाहीत आणि केसांचे आरोग्य टिकून राहते. त्यामुळे केसांसाठी लाकडी कंगवा वापरावा.

2. मेहंदी लावावी का? केस पांढरे झाले असल्यास काय करावे?

उत्तर - केस पांढरे होण्यास नवीनच सुरुवात झाली असल्यास शक्यतो मेहंदी वापरू नये. केस पांढरे होण्याचे कारण शोधून त्यानुसार डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावेत. पांढऱ्या केसांची संख्या जास्त असेल तर आयुर्वेदिक औषधांनी युक्त अशा मेहंदीचा वापर करावा. पांढऱ्या केसांसाठी प्रथम केसांचे परीक्षण करून मग त्यानुसार योग्य प्रकारचे केसांचे तेल, मेहंदी आणि औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.

3. केस मधूनच तुटतात, काय कारण असेल? काय उपाय करावेत?

उत्तर - केसांचे पोषण योग्य प्रकारे झाले नाही तर केस कमकुवत होऊन मधून तुटतात. केसांचा कमकुवतपणा घालवून केस मजबूत करण्यासाठी योग्य प्रकारचे केसांचे तैल वापरण्याबरोबरच केसांना ताकद देणारी औषधे आणि आहार यांचा योग्य प्रकारे वापर करणे गरजेचे ठरते. आयुर्वेदिक औषधांच्या लेपाचा वापर केला असता केसांचे तुटणे लवकर कमी होण्यास मदत होते. खोबरेल तैल, वटजटादी तैल आणि इतर औषधी तैलांचा वापर करावा. आहारामध्ये कठीण कवचाची फळे, गुळ-खोबरे, खजूर- खारीक, गाईचे दूध यांचा समावेश करावा.

4.टक्कल पडलेल्या ठिकाणी आयुर्वेद उपचारांनी केस येऊ शकतात का ?

उत्तर - वेगवेगळ्या कारणांनी केस गळून प्रथम केस विरळ होतात आणि त्यांनतर टक्कल दिसू लागते. टक्कल पडलेल्या ठिकाणी केसांची मुळे असतील तर त्या ठिकाणी त्यांची वाढ पुन्हा झाली तर टक्कल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे केसांची मुळे असतील तर आयुर्वेद उपचारांची नवीन केस आणण्यास मदत होते.



Share on

Like Now
Total Likes
111
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments