Papaya

By Vaidya Harish Patankar  
462     120   0



1. पपई रोज खाल्ली तर चालते का?

उत्तर- पपई ही एक खाद्यफळ ही आहे आणि औषधही आहे. ते अमेरिकेतून भारतात आले आहे असा साधारण प्रघात आहे. पपई अत्यंत स्वादिष्ट असते, अर्धवट पिकलेली पपई ची भाजी अधिक स्वादिष्ट लागते. पोटाच्या विकारांसाठी पपई अत्यंत गुणकारी असते. पपई मुळे पचनशक्ती सुधारते, भूक लागते व कार्यशक्ती वाढते. पपई अत्यंत पाचक, कृमीघ्न, वेदनाशामक, अंगावर दूध उत्पन्न करणारे, कुष्ठघ्न व उदररोग नाशक आहे. पपई तील पेप्सीन या पाचक द्रव्यामुळे मांसाचे उत्तम पचन होते. मुलांना नियमितपणे पपई खाऊ घातल्यास त्यांची उंची वाढते, शरीराला पोषण मिळते व रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते.


2. पपई च्या पानांचा रस घेतल्यास प्लेटलेट्स वाढतात का?

उत्तर- हो, डेंग्यू मध्ये जेंव्हा आपल्या शरीरातील प्लेटलेट्स नामक पेशी कमी होतात तेंव्हा पपई च्या पानांचा रस करून रोज सकाळी व सायंकाळी दोन दोन चमचे द्यावा. याने प्लेटलेट्स ची संख्या झपाट्याने वाढते. पपईच्या पानांची क्रिया हृदयावर डिजीटेलीस प्रमाणे होते, यामुळे हृदयाचे व नाडीचे वाढलेले ठोके नियंत्रणात येतात. हृदयाचे स्पंदन नियमित होते व हृदयाला आराम मिळतो. घाम येऊन लघवीचे प्रमाण वाढल्याने हृदयावरील अनावश्यक ताण कमी होतो शिवाय ताप कमी होण्यास मदत होते.



3. कच्च्या पपई च्या दुधाचा म्हणजेच चिकाचा त्रास होतो का? त्याचा काय उपयोग करतात?

उत्तर- कच्ची मोठी पपई घेऊन तिला मधोमध उभी चिर पाडावी व त्यातून टिपकणारे दूध चिनीमातीच्या बशीत किंवा कपात साठवून छान सुकवून पांढरे चूर्ण बनवावे. हे चूर्ण चांगल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावे व पचनक्रिया बिघडल्यास वेगवेगळ्या प्रकारे वैद्याच्या सल्ल्याने आहारात घ्यावे म्हणजे आमशयाचा दाह, व्रण किंवा अम्ल पित्त मध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. यात असणारे नैसर्गिक क्षार हे अजीर्ण, यकृत दोष, प्लिहा व मूळव्याधीच्या अनेक विकारांत गुणकारी आहेत.


4. पपई कोणी खाऊ नये?

उत्तर- गर्भिणी स्त्रियांनी शक्यतो पपई खाऊ नये. पपई गर्भाशय शोधन करते, रक्तस्राव वाढविते म्हणून ज्यांना पाळीच्या तक्रारी आहेत, मूलव्याधीतून रक्त पडते त्यांनी सुद्धा याचे सेवन करू नये.



Share on

Like Now
Total Likes
120
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments