Sleep - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
322     121   0



1. सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे होतात?

उत्तर- पूर्वीच्या काळी पहाटे अगदी ब्राह्म मुहूर्तावर उठायचे. सूर्योदयापूर्वी आपण उठल्याने सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या शरीरातील वाताचे अनुलोमन उत्तम होते. त्यामुळे पोट उत्तम साफ होते कारण हा वाताचा काळ असतो. या काळात बुद्धी तीक्ष्ण असते. स्मरणशक्ती जास्त असते. त्यामुळे पूर्वी या काळात अध्ययन केले जात असते. लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे. असे त्यामुळेच म्हटले जायी. सकाळी लवकर उठून व्यायाम, योगासने, ध्यानधारणा करावी. देवता स्मरण , पूजन करावे. आयुष्यातील सकारात्मक संकल्प करावेत. दिवसाची सुरुवात एकदा सकाळी उत्तम व सकारात्मक झाली की दिवस आपोआपच सकारात्मक होतो. म्हणून सकाळी लवकर उठावे.


2. दिवसा झोपल्याने काय होते? कोण कोण दुपारी झोपू शकतो?

उत्तर- दिवसा झोपण्याला आयुर्वेदात दिवास्वाप असे म्हणतात. खरंतर सकाळी सूर्योदयानंतर आपण 2 तासाने उठलो तरी तो ही आपला दिवास्वाप च घडला आहे असे समजावे. फक्त सुकुमार, दुर्बल, बल क्षीण, गर्भिणी व बालक यांनाच दिवास्वाप करावयास अनुमती आहे. दिवास्वाप हा रात्री जागरण झाल्यास देखील करू शकता. रात्र पाळी असणारे, काही कारणाने जागरण झालेले या लोकांनी दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या पूर्वी जागरणाच्या निम्मा वेळ म्हणजे आठ तास जागरण झाले असल्यास चार तास झोपावे, नंतर उठून पूर्ववत दिनचर्या पालन करावे. जेवण करून झोपू नये. दिवसा झोपल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. आपल्या शरीरातील विकृत कफ वाढतो, त्यामुळे सर्दी, खोकला, सायनस च्या त्रासा बरोबरच अपचन, अजीर्ण , पोटाच्या तक्रारी तसेच स्थौल्य म्हणजे वजन वाढणे आदी त्रास सुरू होतात. म्हणून बुद्धिमान व्यक्तींनी दिवसा झोपू नये. 


3. आयुर्वेदात तर दुपारी भोजाणोत्तर वाम कुक्षी सांगितली आहे. याचा नक्की अर्थ काय?

उत्तर- वाम कुक्षी म्हणजे भोजाणोत्तर डाव्या कुशीवर काही काळ विश्रांती घेणे. आपले जठर हे भोजणोत्तर अन्नाने भरलेले असते. त्याचा जर आकार आपण पाहिला तर त्याचा आकार डाव्या बाजूला वक्राकार आहे, यामुळे अन्नाचे वजन सर्व डाव्या बाजूला आलेले असते. आपण वाम कुक्षी घेतल्यास गुरुत्वाकर्षण च्या नियमानुसार उदारावरील म्हणजेच पोटावरील अनावश्यक ताण जठराच्या या विशेष स्थानामुळे कमी होतो व आपल्याला हलके वाटते. शिवाय आपल्या शरीरात इडा व पिंगला या दोन शीत व उष्ण नाड्या आपल्या शरीरात अनुक्रमे डाव्या व उजव्या बाजूला स्थित असतात. डाव्या बाजूवर झोपल्याने इडा नाडी दाबली जाऊन पिंगला नाडी कार्यरत होते. पिंगला नाडी देहात उष्णता निर्माण करते, यामुळे पित्त स्त्राव उत्तम होऊन अन्न पचन प्रक्रिया उत्तम राहते. यामुळे भोजाणोत्तर नेहमी अल्प प्रमाणात वाम कुक्षी घ्यावी. किंवा अगदीच झोपावे वाटल्यास खुर्चीवर बसून डुलकी घ्यावी याने कफ वर्धन न होता शरीराला विश्रांती मिळते व पचनशक्ती उत्तम राहते, थकवा जातो व शरीराला बळ मिळते.



Share on

Like Now
Total Likes
121
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments