Butter

By Vaidya Harish Patankar  
266     124   0




1.आहारात लोण्याचा समावेश असावा का? लोणी आपण रोज खाऊ शकतो का?

उत्तर- पारंपरिक पद्धतीने मुरवान लावलेले दही घुसळून त्यातून लोणी काढले जाते. लोणी हे अत्यंत मृदु असते, पचायला तुपापेक्षा हलके असते. ताजे लोणी खूप स्वादिष्ट लागते. लोणी दररोज नवनवीन पेशी निर्मितीसाठी मदत करते. याने शरीर सुकुमार बनते , ते पित्तनाशक व वायुनाशक आहे. डोळ्यांची शक्ती वाढविते, याचे नियमित सेवन केल्यास चष्मा लागत नाही. मूळव्याधीचा त्रास असल्यास लोणी सेवन करावे, अनेक औषधे सुद्धा लोण्यासोबत दिली जातात यामुळे मल मृदु होतो व मूळव्याध पण बरी होते. लोणी हे ताजेच खावे, शिळे लोणी खाऊ नये. ताजे लोणी शीतल , लघु, बुद्धिवर्धक व शरीराचा विकास करणारे असते , रोज खाऊ शकतो. मात्र शिळे लोणी खारट, आंबट होते, अधिक सेवन केल्यास त्वचारोग व अपचन सारखे अनेक विकार होतात.



Share on

Like Now
Total Likes
124
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments