Kaarle- Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
324     159   0




१.कारल्या ची भाजी खाल्ल्याने काय काय फायदे होतात?

उत्तर- कारली ही थंड, मलावरोध दूर करणारी, हलकी, कडू व वायूहारक आहेत. लहान लहान कारली पचायला हलकी, पित्त कमी करणारी, अग्निदीपक असतात. मोठ्या कारल्यापेक्षा ती अधिक गुणकारी असतात. मधुमेही लोकांना कारली विशेष पथ्यकर आहेत. तसेच पोट फुगणे, कावीळ होणे या आजारात सुद्धा कारली विशेष उपयोगी आहेत. कारली उत्तम कृमीघ्न आहेत. त्यामुळे लहान मुलांना आठवड्यातून किंवा महिन्यात एकदा तरी कारल्याची भाजी करून खावी. कारली उत्तम वातानुलोमक व मूत्रजनन करणारी आहेत.

२. कारल्याची पाने सुद्धा उपयोगी असतात का?

उत्तर- हो कारल्याची पाणी ज्वरनाशक, मूत्रल आणि कृमिनाशक असतात. सुश्रुतांनी कारल्याचा रस वमन व विरेचन करण्यासाठी वापरला सांगितला आहे. ताप आल्यावर कारल्याच्या पानांचा रस अंगाला चोळला असता ताप कमी होतो. कारल्याच्या पानांचा रस प्यायला देऊन उलटी म्हणजेच वमन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. कारल्याच्या पानांचा रस व हिंग आणि अल्प सैंधव एकत्र करून दिल्यास लघवीला साफ होऊन मूत्राघात हा विकार दूर होतो. गरम पाण्याबरोबर कारल्याच्या पानांचा रस दिल्यास कृमी नाहीसे होतात. त्वचारोग सुद्धा कारल्याच्या पानांचा रस लावल्यास त्वचारोग लवकर बरे होतात.

3. कारल्याचे मूळ सुद्धा औषधात वापरतात का?

उत्तर- हो, कारल्याचे मूळ उगाळून प्यायल्यास ताप कमी होतो. कारल्याचे मूळ वाटून कंड सुटलेल्या जागी अथवा फोडांवर लेप लावल्याने फायदा होतो. कारल्याचे मूळ वाटून त्यात सैंधव घालून व्रणशोथावर बांधले जाते.



Share on

Like Now
Total Likes
159
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments