Govari - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
1129     314   0



१. गोवारी च्या भाजीचे काय फायदे होतात?

उत्तर- भारतात अनेक भागात गोवारीच्या शेंगांची भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते. लोखंडी तव्यात किंवा खापराच्या भांड्यात केलेली गोवार खूपच उत्तम चव देते. त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली गोवार तर विशेष आवडीची असते. गोवार मधुर, रुक्ष, शीतल, गुरू, अग्निदीपक , सारक, पौष्टिक , पित्तहारक, कफकारक व वायुकारक आहे. शरीरातील हिमोग्लोबिन हा रक्त घटक वाढवायला सुद्धा हिचा उपयोग होतो. तसेच हिच्या सेवनाने रातांधळेपणा पण दूर होतो.

2. गोवार ची भाजी रोज खाल्ल्यास काही त्रास होतो का?

उत्तर- अधिक प्रमाणात गोवारीच्या भाजीचे सेवन केल्यास शेंगदाणा कूट व अन्य मसाला यामुळे ती पित्तकारक होते. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास असणारे, सतत डोके दुखत असलेले व त्वचा रोग असलेल्या लोकांनी गोवारीचे सेवन करू नये. त्याचबरोबर जुनी गवार खाण्यात आल्यास डोके दुखणे, चक्कर येणे , पोटात कळ येणे असे त्रास होतात. अंगावर मूल पीत असल्यास स्तन्यदा मातांनी गवारीचे सेवन करू नये. त्याचबरोबर गर्भिणी स्त्रियांनी देखील गवार ची भाजी जास्त प्रमाणात सेवन करू नये. त्याचबरोबर वात व पित्त प्रकृतीच्या लोकांनी सुद्धा हिचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.

3. गोवारी ची भाजी व लसूण एकत्र खातात का?

उत्तर- हो, गोवारीच्या भाजीत ओवा व लसूण घातल्याने भाजी अधिक स्वादिष्ट बनते. लसणामुळे गवार जास्त चवदार व अग्निदीपक बनते. गवारीच्या पानांचा रस व लसणाचा रस एकत्र करून शरीरावर चोळून लावल्यास शरीराला सुटलेली खाज देखील कमी होते. जखमा झाल्यावर किंवा एखाद्या व्रणावर देखील गवारीच्या पानांचा रस लावल्यास जखम लवकर भरून येते.



Share on

Like Now
Total Likes
314
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments