Nagvel Paan - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
241     116   0



प्रश्न १ :- खाण्याचे पान याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत?

उत्तर :- खाण्याचे पान म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला नागवेली पत्र होय. हे नागवेली पत्र रसाने तिखट असते. याचे वीर्य उष्ण म्हणजे गरम असते. पान हे मुखशुद्धी करणारे, भूक वाढविणारे व पचन करणारे असे आहे. नागवेलीचे हे पान योग्य दक्षता घेऊन व नियम पाळून खाल्ल्यास अतिशय उत्तम उपक्रम आहे. या पानांचा विडा खाल्ल्याने पोटांच्या अनेक रोगांपासून ते त्वचा रोगपर्यंत अनेक व्याधी बऱ्या होतात. आयुर्वेदामध्ये रोजच्या दिनचार्यमधील एक महत्वाचा घटक म्हणून पान सेवन म्हणजेच 'तांबूल सेवन' सांगितले आहे.


प्रश्न २. :- विड्याचे पानाने कोण कोणत्या आजारामध्ये फायदा होतो?

उत्तर :- विड्याचे पानामध्ये जसे विविध घटक टाकू त्यानुसार त्याची उपयुक्तता वाढते. लवंग,वेलदोडे,बडीशेप इ. घटक घालून विडा तयार केल्यास तो पोटासाठी व मुखाची दुर्गंधी घालवण्यासाठी उत्तम ठरतो. यासोबत कात म्हणजेच खदीर घालून नागवेलीचे पान खाल्ल्यास त्वचा रोगविरहीत राहण्यास फायदा होतो. पान हे जंतूनाशक म्हणजेच पोटातील व तोंडातील कृमि काढून टाकण्याचे सुद्धा कामी येते.


प्रश्न ३ :- घरगुती उपायांमध्ये पानाचा वापर कसा होतो?

उत्तर :-ज्यांना सतत सर्दीचा त्रास होत असल्यास पाने चावून खाल्यास फायदा होतो. पोटात वात म्हणजेच वायू अडकून राहिल्यास पान खाल्ल्यास वात सुटतो.नागवेलीच्या पानांवर एरंड तैल लावून त्याने लहान मुलांची छाती शेकल्यास कफ हलका होतो. बाळंतिणीला सतत स्तन दुखीचा त्रास असल्यास नागवेलीचे पाने गरम करून बांधल्यास फायदा होतो. दुखणाऱ्या कानात नागवेली पत्र रसाचे १-२ थेंब टाकल्यास कान दुखत नाहीत.



Share on

Like Now
Total Likes
116
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments