Jeere(Cumin seeds) - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
296     133   0



 १. जिरे पाणी पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते का?

उत्तर- हो. जिरे थंड असतात. यास्तव शरीरात जेंव्हा उष्णता वाढते तेंव्हा जिरे सेवन केल्याने अथवा जिरे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवून ते पाणी सकाळी प्यायल्याने उष्णता कमी होते. म्हणूनतर ' थंडीसाठी जीरा आणि गरमी साठी हिरा' अशी म्हण प्रचलित आहे. 

2. जिऱ्याचे गुणधर्म काय काय असतात?

उत्तर- जिरे हे तिक्त, कटु, मधुर, अल्प उष्ण , पित्तशामक, व अग्निप्रदीपक आहेत. शिवाय रुचिकारक, बुद्धिवर्धक, बालदायक, कफनाशक आहेत. नेत्रांना अधिक हितकारक आहेत. पोटाच्या विकारांत विशेष लाभदायक आहेत. लहान मुलांच्या ग्राईप वॉटर मध्ये सुद्धा याचा समावेश आहे. पोटात गोळा येणे, पोट फुगणे, पोट दुखणे, जुलाब, अतिसार अश्या सगळ्याच आजारात याचा उत्तम उपयोग होतो. जर आले असतील, ओठांवर उष्णता उठली असेल तर जिरे पावडर करून ती त्यावर लावावी. जिरे वतानुलोमक, शूलनाशक व कृमीघ्न सुद्धा आहेत. असे हे बहुगुणी जिरे मसाल्याच्या डब्यातील एक घरगुती उत्तम औषध सुद्धा आहे.

3. घरगुती उपचारात जिऱ्याचा वापर कसा करावा?

उत्तर- ताप आला असल्यास जिऱ्याचा काढा करून प्यायला द्यावा, ताप लगेच उतरतो. उन्हाळी लागली असल्यास, लघवीला त्रास होत असल्यास, उष्णता वाढली असल्यास एक चमचा जिरे कुटून एक ग्लास पाणी टाकून ते पाणी दिवसभर प्यावे म्हणजे उन्हाळीचा त्रास नाहीसा होतो. जिऱ्याचा सेवनाने मातेच्या अंगावर दूध चांगले येते. लहान मुलांचे पोट दुखत असल्यास जिऱ्याचा अर्क काढून तो दोन दोन थेंब जिभेवर टाकावा म्हणजे पोटदुखी पटकन कमी होते. 


4. नेत्र विकारांवर जिऱ्याचा फायदा होतो का?

उत्तर- हो, नेत्रविकारांवर जिरे अत्यंत उपयुक्त आहेत. जिरे सुगंधी व ग्राही आहेत. रोज जिरे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन रातांधळेपणा सुद्धा कमी होतो. जिऱ्याचे पाणी डोळ्यांचे तेज वाढविते.



Share on

Like Now
Total Likes
133
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments