Turmeric

By Vaidya Harish Patankar  
260     111   0



१. लहान मुलांना हळदीचे दूध रोज प्यायला द्यावे का? आणि कधी द्यावे?

उत्तर- हळद ही अत्यंत गुणकारी आहे. भारतीय परंपरेत मसाल्याच्या डब्ब्यात सर्वात महत्वाचे स्थान असलेली, व प्रत्येक आहारात सर्वात पुढे असलेली हळद तेवढीच आरोग्यदायी सुद्धा आहे. हळदीचे गरम दूध रोज सकाळी किंवा रात्री प्यायल्यास आरोग्यासाठी पोषक, रक्तशुद्धीकर, वर्ण उजळवणारे, त्वचेला सुंदर करणारे व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे कार्य घडते. बरेच जण रात्री झोपताना हळदीचे दूध मुलांना प्यायला देतात. याने झोप पण उत्तम लागते, घशातील कफ कमी होतो आणि सर्दी, खोकला पण होत नाही. लहान मुलांसोबत मोठ्या लोकांनाही हे द्यायला हरकत नाही. गरम दुधात हळद व मिरे घालून प्यायल्याने थंडी वाजून येणारा ताप नाहीसा होतो. गरम दूध, हळद व तूप घालून प्यायल्याने सर्दी, कफ व खोकल्यापासून आराम मिळतो. 


2. वेगवेगळ्या आजारात हळदीचा घरगुती उपयोग कसा करावा?

उत्तर- हळद ही तिखट, कडवट, रुक्ष, शुष्क, उष्ण गुणधर्माची असते. कफघ्न व वातशामक पण आहे. जंतुघ्न, कृमीघ्न व दुर्गंधीनाशक पण आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आजारात ती युक्तिपूर्वक वापरता येते. वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी बाधत असल्यास, पचत नसल्यास हळद पूड व जवखार समप्रमाणात घेऊन गरम पाण्याबरोबर रोज सकाळी प्यावी. बाजरीच्या पिठात हळद घालून रात्री झोपताना गोळ्या करून खाल्ल्यास खोकला बरा होतो. घसा दुखत असल्यास हळद मधासोबत चाटण द्यावी. हळद व दार्वी चा काढा मधातून प्यायला दिल्यास प्रमेह दूर होतो. हळद आणि जुना गूळ ताकात कालवून प्यायला दिल्यास मुतखडा फुटून पडायला मदत होते. अशी ही बहुगुणी हळद सर्दी पासून कॅन्सर पर्यंत कोणत्याही आजारात फार युक्तिपूर्वक वापरता येते. मध्यंतरी झालेल्या एका संशोधनानुसार भारतात हळदीचे सेवन जास्त असल्यानेच कॅन्सर चे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले होते.


3. जखमेवर किंवा बाह्य उपचारास हळद कशी वापरावी?

उत्तर- हळद ही बाह्यतः देखील खूप गुणकारी आहे. घसा दुखत असल्यास, टॉन्सिल सुजले असल्यास कोमट हळद मीठ पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हळद अंगाला लावल्यास वर्ण उजळवते, त्वचा सुंदर होते. हळद जखमेवर लावल्यास रक्तस्राव थांबतो, जखम लवकर बरी होते, जंतुघ्न कार्य घडते. हळद शरीराची दुर्गंधी नाशनाचे काम करते. हळद सूज आलेल्या भागी पाण्यातून कालवून लेप करून लावावी. मुक्का मार लागल्यास हळद व रक्तचंदनाची बाहुली उगाळून लावावी, तात्काळ आराम मिळतो. हळद आणि मिठाने दात घासल्यास दात स्वच्छ निघतात. दंत कृमी बरे होतात. अशी ही बहुगुणी हळद अनेक विकारात वापरता येते



Share on

Like Now
Total Likes
111
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments