Pineapple

By Vaidya Harish Patankar  
292     112   0



  १. अननस रिकाम्या पोटी खाऊ नये असे म्हणतात त्याच कारण काय? 

उत्तर- अननस रिकाम्या पोटी खाऊ नये अन्यथा तो विषसमान हानिकारक होतो. अननसातील अम्ल रस हा रिकाम्या पोटी सेवन केल्यास दाहक व भेदक कार्य करतो, त्यामुळे जठराच्या अंत त्वचेला अपाय होऊ शकतो, म्हणून अननस रिकाम्या पोटी खाऊ नये. तसेच गर्भवती स्त्रियांनी देखील अननस फार सेवन करू नये, अननसाचे सेवन यांनी जास्त केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. तसेच केंव्हाही अननस सेवन करावयाचा झाल्यास त्यातील प्रथम बाजूचा काटेरी भाग व मधील कठीण भाग काढून मगच आतील मगज सेवन करावा. अननस कंठ नलिकेला व श्वसन नलिकेला अत्यंत हानिकारक असतो. याचा त्रास झाल्यास साखर व बडीशेप मुरंबा खायला द्यावे किंवा कांदा व दही साखर घालून खायला द्यावे. 


 2. अननसाचा ज्यूस करून प्यावा का? तो काप करून खाल्ल्यास काय फायदे होतात?

उत्तर- पिकलेल्या अननसाचा ज्यूस करून त्यात जिरे , मीठ व साखर घालून सेवन केल्यास पित्त शांत होते. याचे सरबत उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करते, पित्त कमी करते शिवाय हृदयाला व मनाला बल्य कार्य करते. अननस मधूर, अम्ल व कृमीघ्न आणि पित्त नाशक आहे. पोट दुखत असेल, पोटात केस गेला असेल किंवा पोटात कृमी झालेले असतील तर अननसाचे काप जिरे, मीठ, साखर लावून खायला द्यावेत. यामुळे पोटातील सर्व कृमी व केसांसारखे बाह्य घटक उत्तम पाचन होऊन पचनशक्ती सुधारायला मदत होते. अननसाचा रस मध घालून प्यायल्यास घाम येऊन ताप जातो. लहान मुलांसाठी कृमींचे प्रमाण कमी करण्यासाठी अननस हे उत्तम फळ आहे.


3. अननसाचा मुरंबा कसा करावा?

उत्तर- प्रथम पिकलेल्या अननसाची वरची जाड साल व आतील कठीण भाग काढून टाकून फळाचे लहान लहान काप करावेत. नंतर हे काप एक दिवस चुन्याच्या पाण्यात भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी चुन्याच्या पाण्यातून हे काप काढून कोरडे करावेत. नंतर साखरेचा एक तारी पाक बनवून त्यात ते तुकडे टाकावेत. नंतर थंड झाल्यावर त्यात वेलची पूड व गुलाब पाणी घालून मुरंबा बनवावा. या मुरंब्याच्या सेवनाने उत्तम पित्तशमन होते, अग्निदीपन होते, अन्न रुचकर होते व मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होते.



Share on

Like Now
Total Likes
112
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments