Sweet lemon

By Vaidya Harish Patankar  
275     111   0



 1 . मोसंबी चा ज्यूस आजारी लोकांना दिला तर चालतो का?

उत्तर- कित्त्येक आजारांत लोकांची पचनशक्ती मंद झालेली असते, भूक लागत नाही, अंगात शक्ती नसते, काही खावंसं वाटत नाही अश्या वेळी मोसंबीचा रसच त्याच्यासाठी अमृतासमान काम करतो. त्याला बळ देतो, आजारातून बरं करायला मदत करतो. मोसंबी रोगी व निरोगी अश्या दोन्ही व्यक्तींमध्ये उत्तम काम करते. 


 2. मोसंबी सेवनाचे चे काय फायदे होतात?

उत्तर- मोसंबी मधुर रसात्मक असून संत्र्यापेक्षा गोड लागते. शीतल, स्वादिष्ट, रुचकर असून पचायला जड व धातुवर्धक आहे. रक्त सुधारणारी, पौष्टिक, हृदयाला उत्तेजक, दीपक, पाचक, तृष्णाशामक व बल्य आहे. मोसंबीच्या रसात साखर घालून तिचे सरबत बनवून प्यायल्याने उन्हाळ्यातील उष्णता कमी होऊन शीतलता प्राप्त होते. मोसंबी त्वचेला कांती व उजाळा देते. 


 3. मोसंबी कशी खावी? व कोणी खावू नये?

उत्तर- मोसंबी शक्यतो सोलून चावून खावी. मात्र मोसंबी सोलून रस करून थोडी साखर टाकून सरबत बनवून तिचा ज्यूस करून प्यायल्यास ती अधिक शीतल व बल्याकारक बनते. अनेक आजारात मोसंबी चालते. पचनाच्या विकृतीत किंवा उपवासाला फक्त मोसंबी ज्यूस वर राहता येते. मात्र मोसंबी ही लिंबू वर्गीय फळ असल्याने किंचित कफकारक आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा हिला \'स्वीट लेमन\' असे म्हणतात. म्हणून शक्यतो सर्दी, ताप, खोकला झाला असल्यास मोसंबी देणे टाळावे. लहान मुलांनाही सर्दी जाणवत असल्यास, दमा असल्यास मोसंबी देवू नये. मोसंबीच्या सालीचाही फायदा होतो. त्यात एक उदानशील तेल सुगंधी द्रव्य आहे. तो अर्क साबण, दारू किंवा अन्य सुगंधी प्रसाधने बनवायला वापरतात. मोसंबी मध्ये जीवनसत्व \'ए\', \'बी\'व \'सी\' असते. मोसंबीतील जीवनसत्त्वे लहान मुलांपेक्षा मोठ्या लोकांना फार फायदेशीर असतात.



Share on

Like Now
Total Likes
111
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments