Soda Bicard - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
224     113   0



१. आजकाल अनेक आहारीय पदार्थांत खाण्याचा सोडा घातला जातो, हे आरोग्यासाठी अपायकारक आहे का?

उत्तर- हो, खाण्याचा सोडा हा जमिनीत प्राप्त होणारा एक प्रकारचा क्षार आहे. आजकाल रासायनिक पद्धतीने सुद्धा तो प्राप्त केला जातो. हा साधारण पांढऱ्या रंगाचा असतो. खाण्याच्या सोड्याने आजकाल मसाल्याच्या डब्ब्यात स्थान मिळवले आहे. कडधान्ये शिजवताना, पोळ्या बनविताना , भजी बनविताना वापरला जातो. यामुळे हे जड पदार्थ लवकर शिजायला मदत होते. खाण्याचा सोडा जड, तिखट , स्निग्ध व शीत आहे , वातानुलोमक आहे, मात्र अधिक व रोज प्रमाणात याचे सेवन झाल्यास ते आरोग्यास हानिकारक आहे.


२. खाण्याच्या सोड्याचा आरोग्याच्या दृष्टीने कसा उपयोग करतात?

उत्तर- पोटदुखी झाल्यास खाण्याचा सोडा एक चिमुट एक ग्लास लिंबू पाणी घेऊन त्यात टाकून तो प्यायला दिल्यास पोटदुखी पटकन थांबते. आजकाल अनेक रस्त्यावरील गाड्यांवर देखील सोडा बॉटल मिळत असतात. लहान मुलांच्या अपचनाचा विकारात देखील खाण्याचा सोडा अल्प टाकून लिंबू चाटायला दिल्यास फायदा होतो. सोडा आणि चुनकळी एकत्र करून त्वचेवर खरुज उठले असल्यास अथवा खाज येत असल्यास लावावी, तात्काळ आराम मिळतो.


३. लहान मुलांमध्ये सोडा औषधी आहे का?

उत्तर- हो , लहान मुलांच्या किरकोळ अपचनाचा तक्रारी व किरकोळ दुखण्यातही खाण्याचा सोडा हे रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना छातीत कफ झाला असल्यास, आईच्या दुधात एक चिमूट सोडा व गुळ एकत्र कालवून पाजावे, याने उलटी होऊन कफ निघून जातो व मुलांना तात्काळ आराम मिळतो. काही ग्राईप वॉटर सारख्या औषधांमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात हा खाण्याचा सोडा असतो त्यामुळे लहान मुलांची पाचन प्रक्रिया सुधारते, भूक लागते व पोट दुखत असल्यास कमी होते.



Share on

Like Now
Total Likes
113
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments