White Hair

By Vaidya Harish Patankar  
293     100   0



1. डोक्यातील पांढरे केस उपटल्यावर पुन्हा पांढरे केस उगवतात असे म्हणतात हे खरं आहे का?

उत्तर- हो, असे म्हटले जाते की डोक्यावरील पांढरे केस उपटले की तिथे पुढील येणारे केस पण पांढरेच येतात व पांढऱ्या केसांची संख्या वाढते पण हे पूर्णतः सत्य नाही. केस उपटून पांढरे केस कमी होत नाहीत हे मात्र सत्य आहे. पांढरे केस बनण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने पुढील केस अजून पांढरेच येत राहतात, त्यांची संख्या वाढतच जाते म्हणून आपल्याला असे वाटते की ते पांढरे केस उपटल्यामुळे वाढले आहेत. आयुर्वेदात सांगितलेली काही तेल तिथे लावून आपल्याला हे प्रमाण कमी करता येत. केस पांढरे का होत आहेत याच कारण प्रथम शोधाव. अति प्रमाणात मीठ खाणे, भाजीत असेल तरी वरून परत मीठ घेणे, लिंबू जास्त प्रमाणात सेवन करणे, दही अधिक खाणे, चिंता, जागरण, व्यायाम न करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात न बसने या व अश्या अनेक कारणांनी केस पांढरे होत असतात. शिवाय केस पांढरे दिसत आहेत म्हणून काही लोक घरात कार्यक्रम असला की डाय करतात, हेअर कलर करतात, यानंतर केस पांढरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि अजूनच लवकर सर्व डोक्यावरील केस पांढरे होतात.


2. केस पांढरे दिसू लागले तर डाय करावा का? हेअर कलर केल्यावर केस जास्त पांढरे होतात का?

उत्तर- हो, जेवढा हेअर कलर कराल, डाय कराल तेवढं केस स्वतः चा रंग निर्मिती प्रक्रिया विसरून जातो व केसांचा रंग अधिकच पंधरा होत जातो. नंतर नंतर तर नेहमीच डाय करावा लागतो. सगळेच केस अगदी कापसाप्रमाणे पांढरे होऊन जातात. म्हणून शक्यतो नैसर्गिक रंग किंवा मेहंदी वापरावी व डाय करणे टाळावेच. शिवाय सतत डाय केल्याने केसांची हानी होते. रुक्षता वाढते, केस मधूनच तुटू लागतात.



Share on

Like Now
Total Likes
100
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments