Hair Straightening

By Vaidya Harish Patankar  
232     103   0



आजकाल केसांचे स्ट्रेटनिंग केले जाते ते योग्य आहे का?

उत्तर- आजकाल अनेक मुली केसांचे स्ट्रेटनिंग करून घेत असतात. खरतर हे आपापली प्रकृती पाहून , केसांची प्रकृती पाहून, अतिस्निग्ध केस असतील तरच केले पाहिजे, अन्यथा यामुळे तात्पुरते केस छान वाटत असले तरी कायमचे दीर्घकालीन खराब होऊ शकतात. केस सरळ छान होतात, मात्र ते करत असतानाच केस जळल्याचा वास येत असतो, त्यातील केराटिन नामक प्रोटीन जळत असत. त्यामुळे केस अत्यंत रुक्ष होतो, त्यास पुन्हा अधिक बाह्य व आभ्यान्तर प्रोटीन व स्निग्ध गुणांची गरज पडते. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने एकवेळ स्ट्रेटनिंग केलं तर केस कमी डॅमेज होतात व छान पण दिसतात. मात्र वात प्रकृतीच्या व्यक्तीने स्ट्रेटनिंग केलं तर केस अधिकच रुक्ष होऊन मधूनच तुटू लागतात व शिवाय त्यांना ते तेवढं सुंदर दिसतही नाही. लक्षात ठेवा कोणत्याही अनैसर्गिक चिकित्सा या सुंदर दिसत असल्या तरी कायमस्वरूपी योग्य नाहीत, त्याचे काही न काही दुष्परिणाम हे होणारच, म्हणून हे जमेल तेवढ टाळलेलेच बरे किंवा प्रकृती परीक्षण करून आपल्याला योग्य आहे का हे पाहून करावं.



Share on

Like Now
Total Likes
103
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments