Skin diseases

By Vaidya Harish Patankar  
316     112   0



1. आजकाल त्वचारोग फार वाढले आहेत, आयुर्वेदात काही तात्काळ उपाय आहेत का?

उत्तर- तात्काळ औषध शोधण्याचा व बरे होण्याच्या घाईनेच त्वचारोग वाढलेले आहेत. आपल्याला झालेल्या त्वचारोगाचा प्रकार ही न शोधता लोक वेगवेगळे क्रीम किंवा लोशन लावतात. त्याने थोडा वेळ बरं वाटत पण आजाराचं स्वरूप थोडं बदलत आणि पुन्हा त्वचारोग जास्तच वाढतो. आपली त्वचा ही तेंव्हाच निरोगी असू शकते जेंव्हा आपलं शरीर नोरोगी राहील. लक्षात ठेवा त्वचारोगाचे निदान होणे फार महत्वाचे, डॉक्टरांचे निम्मे आयुष्य त्वचारोग तज्ञ बनण्यात गेलेले असते तरी त्यांना त्याच लवकर निदान करण प्रत्येक अवघड जात कारण त्वचारोग च मुळात असंख्य आहेत व प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आपल्याला मात्र सहज कोणीही सांगितलेले औषध निदान न करताच त्यावर लावून पाहायचं असत, याने वेळ ही जातो आणि आजार अजूनच गंभीर बनत जातो. त्वचारोग हे आतून रक्तशुद्धी तून बरे केले गेले तरच ते कायमस्वरूपी बरे होतात, मग त्यासाठी थोडा वेळ गेला तरी हरकत नाही, प्रथम दिवसापासून च आयुर्वेद सुरू करा.



Share on

Like Now
Total Likes
112
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments