Bermuda Grass (Durva) Juice

By Vaidya Harish Patankar  
224     100   0



दुर्वा चा स्वरस आपण रोज घेऊ शकतो का?

उत्तर- दुर्वा या गणपती पूजेतील पण सर्वात महत्वाच्या पत्री आहेत. दुर्वा या आयुर्वेदानुसार पित्त शामक आहेत, आपण दुर्वा स्वरस रोज घेऊ नये मात्र आपणास पोटात जळजळ होत असेल, पित्त वाढले असेल, पचनशक्ती बिघडली असेल, डोके दुखत असेल, माथा शूल असेल, डोकं गरम लागत असेल तर एक चमचा दुर्वा स्वरस खाडीसाखरेसह घेऊ शकता. आजकाल दुर्वा कल्प सुद्धा मिळतो, तोही उत्तम बल्य, रोगप्रतिकारक शक्ती वर्धक व लहान मुले आणि स्त्रियांसाठी उत्तम आहे. दुर्वा स्वरस वा कल्पाने पाळीच्या तक्रारी सुद्धा कमी होतात. अंगावरून रक्त फार जात असल्यास कमी होते. अंगावर पित्त उठणे, शीत पित्ताचा त्रास, खाज सुटणे, पित्ताच्या गाठी उठणे हे सर्व याने कमी होते. दुर्वा शीत व बल्य व पित्तशामक आहेत.



Share on

Like Now
Total Likes
100
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments