Steamed Dumpling (Modak)

By Vaidya Harish Patankar  
224     111   0



मोदक बुद्धिवर्धक असतात की कफवर्धक?

उत्तर- मोदक हे गव्हाचे पीठ, किंवा तांदळाचे पीठ, खोबऱ्याचा किस, गुळ, थोडी वेलची पासून उकडीचे मोदक बनवतात. भरपूर तूप टाकून खाल्ले जातात. खरंतर यातील सर्वच घटक कफवर्धक आहेत. पण खोबरे व तूप हे बुद्धिवर्धक पण आहेत. कठीण कवचाची फळे ही शक्यतो बुद्धिवर्धक असतात. गणपती बुद्धीची देवता आहे. मोदकाने पोषण उत्तम होते, मात्र अति प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढणे, झोप जास्त लागणे, कफ वाढणे इत्यादी त्रास पण होऊ शकतात. लहान मुलांना मोदक आवर्जून खायला द्यावेत. त्यामुळे मुलांचे पोषण उत्तम होऊन बुद्धी स्मृति वाढायला ही मदत होते.



Share on

Like Now
Total Likes
111
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments