Diabetes - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
295     107   0



1. मधुमेहाच्या रुग्णांनी केळी खायला हवी का?

उत्तर- मधुमेह केळी किंवा तत्सम कफवर्धक फळे अधिक खाल्ली तर रक्तातील साखर वाढून व कफ वाढून अधिकच वाढतो. त्यामुळे शक्यतो केळी कमी प्रमाणात खावीत. मात्र उपचारांमध्ये सुद्धा पिकलेले केळी आवळ्याच्या चूर्णासोबत रात्री खायला दिल्यास मधुमेहात होणाऱ्या सततच्या लघवीचे प्रमाण कमी होते, हा उपचार मात्र वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. केळी ही उत्तम पोषक आहेत मात्र प्रमाणात खावीत कारण ती कफवर्धक पण आहेत. 


2. आयुर्वेदात मधुमेह सांगितला आहे का?

उत्तर- हो. आयुर्वेदात प्रमेह म्हणजेच अधिक प्रमाणात मूत्रप्रवृत्ती होणे हा आजार सांगितला आहे. याचे वीस प्रकार वर्णन केलेले आहेत. त्यातील विसावा प्रकार ज्यामध्ये मूत्र हे मधाप्रमाणे होऊ लागते त्यास मधू मेह असे म्हटले आहे. तत्पूर्वी इक्षू मेह म्हणजे उसाच्या रसाप्रमाणे, सार मेह, सांद्र मेह, हरिद्रा मेह, मंजिष्टा मेह असे एकोणिस प्रकार वर्णन केलेले आहेत. आयुर्वेदानुसार मधुमेह जाणून घेतल्यास आपण आधुनिक कालातील सरसकट सर्वच प्रमेहाच्या प्रकारांना मधुमेह म्हणण्याची चूक करणार नाही. यातील पाहिले दहा प्रकार हे साध्य म्हणजे सहज बरे होणारे आहेत. काही आहारातील बदल, पथ्य व औषधांनी यांना बरं करता येत. म्हणूनतर निदान योग्य केल्यास आजार बरा करण अजून सोपं जातं.



Share on

Like Now
Total Likes
107
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments