Potato - Ayurved Pespective

By Vaidya Harish Patankar  
337     144   0



१. आजकाल आहारात सगळीकडे बटाट्याची भाजी जास्त असते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचेच पदार्थ खाण्यात येतात. बटाट्याचा आरोग्याच्या दृष्टीने कसा विचार करावा?

उत्तर- बटाटा हा जमिनीखाली येणारा कंद वर्गातला आहे. त्यामुळे बटाटा हा गुरू, पृथ्वी , आप व वायू महाभूताने प्रधान रसाने मधुर, रुक्ष व शीत गुणधर्माचा आहे. बटाट्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील कफ वाढतो व अपचन झाल्यास वायू सुद्धा वाढून गॅसेस अधिक होतात. बटाटे गुरू व पोषक असल्याने तात्काळ आपल्या शरीराच्या ऊर्जेच्या गरजा भागविते. त्यामुळे व्यायाम करणारे, कष्टाची कामे करणारे यांना बटाटा अत्यंत हितकर व आरोग्यासाठी बालदायी आहे. मात्र गुरू व तम गुण जास्त असल्याने अभ्यास करणारे, व्यायाम न करणारे, जे कष्टाची कामे करत नाहीत त्यांनी याचे सेवन केल्यास याने बुद्धी मांद्य होते, झोप लागते व अभ्यास होत नाही.


2. लहान मुलांना बटाटा रोज सेवन करायला द्यावा का?

उत्तर- जसे की बटाटा हा कफवर्धक आहे त्यामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला झालेला असल्यास बटाटा खायला देऊ नये, कारण बटाटा हा कफवर्धक आहे. उकडलेले बटाटे गोड लागतात त्यामुळे मुलांना ते फार आवडतात, शिवाय आजकाल बटाट्यापासून केलेले फ्रेंच फ्राईज देखील मुलांना फार आवडतात. त्यावर मसाले देखील अगदी चविष्ट टाकले जातात, त्यामुळे मुले हे आवडीने खात असतात. मात्र कफ प्रकृती असलेल्या, कफाचे आजार असलेल्या, फुफ्फुसांचे आजार असलेल्या लहान मुलांना बटाटा हा वैद्यकीय सल्ल्यानेच द्यावा, कमी द्यावा किंवा टाळला पाहिजे. मात्र इतर वेळी काही आजार नसल्यास पचन शक्ती उत्तम असल्यास लहान मुलांसाठी बटाटा हे एक उत्तम व पोषक, बळ देणारे, तात्काळ भूक भागविणारे उत्तम अन्न आहे.


3. उपवासाला बटाटा व त्याचे अनेक पदार्थ खाल्ले जातात, याचे कारण काय? उत्तर- पूर्वी लोक उपवास असल्यास अनेक वेळ देवपूजा करता यावी, पूजा, मंत्रोच्चार, अनुष्ठान संपायला वेळ लागायचा म्हणून कंदमुळे अथवा गुरू अन्न सेवन करायची. म्हणजे कमी आहारात देखील पोट भरत असे व पचायला जड आहार असल्याने लवकर भूक देखील लागत नसे. त्यामुळेच बटाटा देखील एक कंद वर्गात व जमिनीच्या खाली येत असल्याने लोक रुढीने बटाटा सुद्धा उपवासाला खाऊ लागले. यात बटाट्याचे वेफर्स, वडे, खीर, पुरी , शिरा अथवा बटाटा भाजून, वाफळून असे अनेक प्रकार तयार करून ते सेवन केले जातात. बटाटा हा अत्यंत स्वादिष्ट व पोषक असल्याने त्यास 'भाज्यांचा राजा' असेही संबोधले जाते.



Share on

Like Now
Total Likes
144
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments