Alopecia and Hair Care

By Vaidya Harish Patankar  
340     112   0



1.डोक्यात चाई पडली आहे. अनेक वर्षे झालं, अनेक उपचार घेऊनही फायदा झाला नाही , काय करावे?

उत्तर- चाई म्हणजे आयुर्वेदात इंद्रलुप्त हा आजार. मॉडर्न मध्ये याला ऑलोपेशीया तर सामान्य भाषेत चावी लागणे असेही म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. एकाच ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकारातील जागेतील केस जाणे, क्वचित तेथे खड्डा पडणे, असे अनेक चट्टे उठणे, त्या ठिकाणी कोड पण व चाई पण एकत्र येणे, सर्व डोक्याचेच केस एकदम जाणे, दर वर्षी केस जाणे व परत येणे मात्र कोणताना ना कोणता पॅच तसाच सतत विरळ चाई पडलेला असणे. असे अनेक प्रकार असतात. यानुसार त्यांची उपचारांची दिशा पण बदलते. आजकाल केशायुर्वेद सारख्या भारतातील पहिल्या आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब मध्ये त्या प्रकारचे सुद्धा परीक्षण करता येते. किंवा कोणत्याही लॅब मध्ये जाऊन काही विशिष्ट रक्त तपासण्या करून सुद्धा यातील ऑटो इंम्युन सारखा काही प्रकार याचे कारण असल्यास शोधत येतो. योग्य प्रकार शोधून उपचार केल्यास निश्चितच आजार लवकर बरा होण्यास मदत होते. लोकं निदान करून न घेता अनेक सांगी वांगी घरगुती औषध वापरत राहतात व वेळ वाया घालवितात. यामुळे आजार अजूनच निबिड होतो व बरा करायला कठीण होऊन बसतो. आयुर्वेदात अनेक लेप, पोटातील औषधे व काही पंचकर्म उपचार सांगितले आहेत, ज्यांच्यासहाय्याने आपण यातून कायमची मुक्ती सुद्धा मिळवू शकतो. 


2. माझ्या मित्राला केस उपटण्याची सवय आहे, त्यातून त्याच्या डोक्यातील केस विरळ झाले आहेत. हा काय प्रकार आहे? यावर उपाय आहे का?

उत्तर- हो. हा एक प्रकारचा आजार आहे. यात रुग्ण स्वतःच्या हाताने रोज सतत कळत, न कळत केस उपटत राहतो व त्या भागातील केस विरळ होतात, चाई पडते किंवा टक्कल पडल्यासारखे सुद्धा वाटते. यास आधुनिक शास्त्रात ट्रायकोपटीलोमेनिया असेही आजाराचं नाव देतात. ही एक मानसिक विकृती सुद्धा आहे. याचा अर्थ व्यक्ती मानसिक रुग्ण आहे असे नव्हे व्यक्ती उत्तम असतो पण अशी एखादी चुकीची सवय लागलेली असते जी बंद करणे अवघड जाते. यासाठी योग्य पोटातील उपचार, काही पथ्य व लावायला तेल , औषधे दिली की हा आजार बरा होतो. लक्षात ठेवा या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर याचे मोठ्या विकृतीत रूपांतर होते. 


3. केसांना आठवड्यातून एकदा दही लावून केस धुवावेत का? फायदा काय होतो?

उत्तर- अनेक लोक आठवड्यातून एकदा दही लावून किंवा अंड्याच्या बलक लावून केस धुतात. या ने केसांना त्यातील स्निग्धता मिळते, आधुनिक शास्त्रानुसार प्रोटीन मिळते व ज्यांचे केस रुक्ष आहेत त्यांना याचा फायदा होतो. पण असे एकांतीक उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण तुमच्या प्रकृतीला ते योग्य नसल्यास यातून गेलेले केस अथवा डॅमेज झालेले केस पुन्हा बरे करणे खूप अवघड होऊन बसते.



Share on

Like Now
Total Likes
112
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments