Child care

By Vaidya Harish Patankar  
211     99   0



1. लहान मुलांना सतत सर्दी होत आहे, छाती भरली आहे, काय उपाय करावा?

उत्तर- लहान मुलांना सतत होणारी सर्दी व भरलेली छाती हे कफ वाढल्याचे लक्षण आहे. त्यामुळे मुलांचा कफवर्धक आहार कमी करावा. दूध, केळी, पनीर, बेकारी चे पदार्थ कमी करावेत. मूळ अंगावर पीत असल्यास आईने कफवर्धक आहार टाळावा. दिवसा जेवणानंतर झोपणे टाळावे. मुलांचे छाती पाठ, पोट ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे, वेखंड चूर्ण कपाळ, छाती, पाठीला थोडेसे लावावे, जमल्यास जेष्ठमधाची काडी चघळायला द्यावी. सितोपलादी चूर्ण थोडंस मधासह दोन तीन वेळा चाटवावे. मुलांना जमल्यास थोडी मशीन च्या साहाय्याने वाफ द्यावी, सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडं बसवावे, म्हणजे हा सर्दी चा त्रास कमी होतो. लक्षात ठेवा लहान मुले ही नाजूक असतात, त्यांचा प्रत्येक छोटा छोटा आजार पण लवकर बरा करावा, लक्ष द्यावे नाहीतर फुलासारखी ही मुलं लगेच कोमेजून जातात. 


2. मुलांना सकाळी नाष्ट्याला काय द्यावं?

उत्तर- खरंतर लहान मुलांचा नाष्टा हा पौष्टिक असावा. आजकाल बिस्किटे, खारी, मॅगी , फ्लेक्स अश्याच गोष्टी जास्त दिल्या जातात. मात्र यामुळे पचनशक्ती तर बिघडतेच शिवाय आहार अंगी लागत नाही. तब्बेत होत नाही, पोषण होत नाही. मुलांना उपमा, पोहे, शिरा, हुलग्यांचे माडगे, वेगवेगळ्या भाज्या घालून केलेली थालीपीठ, रव्याची खिर , गव्हाची लापशी, मूग भात खिचडी आणि असेच वेगवेगळे पौष्टिक पदार्थ नाष्ट्याला द्यावेत. ज्यांचा नाष्टा पोटभर व पौष्टिक होतो अश्या मुलांचे आरोग्य उत्तम राहते. सकाळी सकाळी पोळी भाजी च्या जेवणाचीच सवय लावल्यास अजून उत्तम. 


3. लहान मुलांना दिवसा झोपू द्यावे का?

उत्तर- ज्या लहान मुलांना सकाळी लवकर शाळा असल्याने लवकर उठावे लागते, रात्री जी मुलं लवकर झोपतात त्यांना थोडं दुपारी झोपू द्यायला हरकत नाही. पण जी मूल रात्री उशिरा झोपतात, सकाळी मुद्दाम उशिरा उगतात त्यांना दुपारी बिलकुल झोपू देऊ नये, किंबहुना दुपारी झोपल्यानेच ती रात्री लवकर झोपत नाहीत मग इतरांना त्रास देणे, किरकिर करणे, काहीतरी जागे राहायला कारणे शोधणे असे उपक्रम करत बसतात. त्यामुळे मुलांना दुपारच्या झोपेची थोडी गरज असतेच मात्र ती सकाळी लवकर उठणाऱ्या व रात्री लवकर झोपणाऱ्या मुलांनाच ही मुभा द्यावी.



Share on

Like Now
Total Likes
99
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments