Facial - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
294     124   0



1. चेहऱ्यावर वांग आहे, लवकर कसे घालविता येईल? चार महिन्याने लग्न आहे.

उत्तर- चेहऱ्यावर वांग हे अनेक कारणांनी येऊ शकत. त्याचे कारण शोधून पोटातून उपचार दिल्यास ते नक्की लवकर बरे करता येत. पाळीच्या तक्रारी, यावेळी जेवण, रात्री जागरण, वाढलेले पित्त ही त्याची प्रमुख कारण. मात्र तात्काळ वांग घालवायचे असल्यास पूर्वीच्या काळी लेखन, प्रच्छान कर्म किंवा जलौका म्हणजेच जळू वापरून रक्तमोक्षण केले जात असे. नंतर त्यावर काही लेप लावले जात असत, याने वांग लवकर बरी होते. आजकाल मात्र हेच काम आधुनिक मशीन मायक्रो डर्मा अब्रेजन ने सहज करता येत. यातील डायमंड व क्रिस्टल हे प्रोब वापरून दोन ते चार सेटिंग मध्येच या वांग घालविता येतात, खूप प्रमाणात तात्काळ कमी होतात व सोबत आयुर्वेदाची पोटातून औषधे चालू ठेवल्यास पुन्हा येण्याच प्रमाण ही अगदी नगण्य आहे. त्यामुळे जवळच्या एखाद्या सौंदर्य चिकित्सा करणाऱ्या क्लिनिक मध्ये जाऊन तुम्ही या आधुनिक व आयुर्वेदिक उपचारांची माहिती घेऊन वांग तात्काळ व लवकर घालवू शकता. सोबत अन्य काही उपचार करून चेहरा छान चमकदार व आकर्षक करू शकता.

 2. सतत फेशिअल करणे, ब्युटी पार्लर मध्ये जाणे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी योग्य आहे का?

उत्तर- सौंदर्य हे जेवढं नैसर्गिक तेवढं चांगलं. आतून आहारातून कमावलेले सौंदर्य दीर्घकाळ टिकतं. शिवाय योग प्राणायाम आहार यामुळे एक नैसर्गिक तजेलदार पणा आपल्या चेहऱ्याला मिळतो. हेच काम ब्युटी पार्लर मध्ये तात्पुरते व कृत्रिम सौंदर्य प्रसाधने वापरून केले जाते. तात्पुरते छान वाटते पण दीर्घकाळ साठी हा मार्ग उत्तम नव्हे. याने त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य खराब होते. अगदी नैसर्गिक शेती व रासायनिक शेती सारख समजा हवं तर. रासायनिक शेतीने पिक छान दिसत, लवकर वाढत, उत्पन्न जास्त मिळत पण शेतीचा पोत खराब होतो, तर नैसर्गिक सेंद्रिय शेती ने ती कसदार होते, पोत सुधारतो शिवाय उत्पन्न कमी असल तरी त्यातील पोषक तत्व व अन्न चवदार आणि उत्तम असत. अगदी तोच फरक या दोन्ही सौंदर्य प्रसादनांमध्ये सुद्धा आहे.

3. चेहऱ्या वरील सुरकुत्या कमी करायला घरगुती काय उपचार करता येईल?

उत्तर- चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायला आहारात तुपाचे प्रमाण वाढवावे लागेल. ताजी फळे व ताज्या पालेभाज्या, फळभाज्या जास्तीत जास्त सेवन कराव्या लागतील. सोबत रोज चेहऱ्याला बदाम तेलाचा मसाज केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या खूप छान कमी होतात. पपई, केळी , कोरफड यांचे पल्प, गर काढून त्याने आठवड्यातून किमान दोन वेळा मसाज करावा म्हणजे सुरकुत्या लवकर जायला मदत होते.



Share on

Like Now
Total Likes
124
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments