Morning Sunlight - Ayurved Perspective
By Vaidya Harish Patankar548 267 0
1. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यावर काय फायदे होतात?
उत्तर- सकाळचे कोवळे उन्ह हे आरोग्यदायी असते. आयुर्वेदात 'आरोग्यम भास्करात इच्छेत' असे म्हणतात. म्हणजे आपल्याला आरोग्यप्राप्ती हवी असेल तर त्याची इच्छा सूर्याकडे करावी. म्हणून सकाळी सूर्यनमस्कार करावेत, सूर्योपासना करावी. शिवाय सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने आधुनिक शास्त्रानुसार आपल्या शरीरात 'ड' जीवनसत्वाचे निर्मिती होण्यास मदत होते. यामुळे हाडे बळकट होतात. शिवाय मांस पेशींना व अस्थींना बळ मिळते. केसांची वाढ होते. लहान मुलांना सकाळी तेल लावून , स्नान घालून कोवळ्या उन्हात बसवल्याने त्यांची वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते , हाडे व स्नायू मजबूत होतात. दृष्टी दोष नहोसे होऊन दृष्टी सुधारते म्हणून सकाळी कोवळ्या उन्हात बसावे.
2. सायंकाळी व्यायाम करावा का? सायंकाळी जिम ला जावे का?
उत्तर- आजकाल वेळेच्या नियोजनामुळे अनेक जण सकाळी व्यायाम न करता सायंकाळी व्यायाम करतात, सायंकाळी जिम ला जातात. मात्र सकाळी व्यायाम करणेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य व उत्तम आहे. सायंकाळी व्यायाम करावयाचा असल्यास सकाळी लवकर जेवण झालेले असावे. दुपारी उशिरा जेवण करून लगेच सायंकाळी व्यायाम करू नये. यामुळे अर्धवट पचलेले अन्न रक्ताभिसरणाच्या माध्यमातून पूर्ण शरीरभर फिरते, हा आयुर्वेदातील आम आहे, त्यामुळे अनेक आमवाता सारखे सांध्यांचे आजार मागे लागतात. शिवाय आजकाल AC लावून जिम मध्ये व्यायाम केला जातो, घाम येणे हे व्यायामाचे लक्षण आहे व व्यायाम करताना अश्या प्रकारे AC लावून स्वेदचा अवरोध केल्यास हृद्रोग, त्वचारोग होऊ शकतात. म्हणून शक्यतो सायंकाळी व्यायाम टाळावा, तसेच AC मध्ये जिम मध्ये व्यायाम करू नये.
3. व्यायामानंतर लगेच ज्यूस पिण्याची सवय आहे, हे योग्य आहे का?
उत्तर- व्यायामानंतर लगेच अति प्रमाणात थंड पाणी, कलिंगडाचा किंवा अन्य फळांचा ज्यूस अनेक लोक घेत असतात. व्यायामामुळे आलेला थकवा सुद्धा लगेच याने जात असल्याने त्यांना बरे वाटते. मात्र असे करू नये. थोडा वेळ तरी थांबाव, किमान अर्धा एक तास तरी. जसे गरम गरम कंदिलाच्या काचेवर आपण दोन थेंब पाणी शिंपडले तरी त्या काचेला तडा जातो अगदी तसेच व्यायामाने गरम झालेल्या शरीराला, रक्तवाहिन्यांना एकदम थंड काही दिल्यास तिथे विरुद्ध क्रम सेवन होते व त्या सुद्धा अचानक आकुंचन पावणे, क्वचित त्यांस तडा जाणे असे संभव होऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून असे व्यायामानंतर काहीही थंड लगेच तरी किमान पिवू नये, काही काळाने चालेल.
Comments
Latest Posts
-
Urine......
( 4 years ago) -
Vaman, Virechan......
( 4 years ago)