Eyes, Tongue - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
247     109   0



1. फक्त डोळ्यांवरून आजार समजतो का? डॉक्टर डोळ्यांत का पाहत असतात?

उत्तर- हो. या शास्त्राला आयरिडॉलॉजि असे म्हणतात. यामध्ये डोळ्यांच्या सूक्ष्म अति सूक्ष्म इमेजेस घेऊन त्यामध्ये शरीरातील सर्व अवयवांचे त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार विभागणी केलेली असते. आधुनिक शास्त्रात या आयरिडॉलॉजि च्या साहाय्याने अनेक आजारांचे निदान केले जाते. आयुर्वेदात अष्टविध परीक्षणात दृक म्हणजेच नेत्र परिक्षणाला विशेष महत्व आहे. आपले शरीर योगवही असते. आपला आनंद, दुःख, राग , प्रेम सुद्धा डोळ्यातून व्यक्त होत असत. सहज समजतं. ज्याप्रमाणे मानसिक भाव एवढ्या सहज डोळ्यात प्रकट होतात त्याचप्रमाणे शारीरिक भाव, बदल , आजार सुद्धा डोळ्यात प्रकट होत असतात. ज्वराच्या पूर्वरूपात 'पित्तात नयनहो दाह:|' असे वर्णन मिळते. म्हणजे आपल्याला पित्तज ज्वर येणार असेल तर आपल्या डोळ्यांमध्ये दाह उत्पन्न होतो व अल्प आरक्तात येते. कावीळ झाली असता डोळे पिवळे होतात. रक्तपित्तात डोळे लाल होतात. जागरण केले तरी डोळ्यातील प्रभा बदलते. थोडक्यात काय तर अश्याप्रकारे अनेक आजारात आयुर्वेदाच्या साहाय्याने सुद्धा आपण नेत्र परीक्षण अर्थात आयरिडॉलॉजि करून अनेक आजारांचे निदान करू शकतो. असेच आयुर्वेदात नाडी परीक्षण, जिव्हा परीक्षण, कर्ण परीक्षण, मुख परीक्षण , मल परीक्षण, मूत्र परीक्षण, शब्द परीक्षण, स्पर्श परीक्षण, आकृती परीक्षण, केश , नख, त्वक असे अनेक शारीरिक अवयव अथवा भावपदार्थांचे परीक्षण करता येते. जसे शितावरून भाताची परीक्षा करतात अगदी तसेच डोळ्यांवरून पूर्ण शरीरातील व्याधी व मानसिक भावांचे परीक्षण करता येते. सुश्रुतांच्या नुसार आपल्या शरीरातील दृष्टी व रोमकूप हे आपले व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असतात. ते कधीच बदलत नाहीत. म्हणून तर आधार कार्ड किंवा पर्मनंट आयडेंटिफिकेशन साठी आपले आयरिस म्हणजे डोळे व अंगठा च्या ठस्यांचाच आजही वापर केला जातो.


2. जिभेवरून पण आजार ओळखता येतात का?

उत्तर- हो , आपली जीभ हा आपल्या पोटाचा आरसा असतो. फक्त जिव्हा परीक्षण करून सुद्धा आपण पोटातील सर्व आजारांचे निदान करू शकतो. आपल्याला अपचन झाले असल्यास जिभेवर पांढरा थर येतो. तर पित्त वाढू लागल्यास जिभेवर गर पडू लागतात, तोंड येते. पोट साफ होत नसल्यास तोंडातून दुर्गंधी येते. जीभ हा पचन प्रक्रियेचा पहिला व सर्वात महत्वाचा अवयव आहे. म्हणून रोज दातांबरोबर जीभ पण स्वच्छ करावी. जिव्हा परिक्षणावरून पण अनेक आजार ओळखता येतात.

3. नाडी तपासल्यावर खरच आजार समजतात का?

उत्तर- हो. नाडी परीक्षण हे पूर्वी पासून रोग निदानाचे उत्तम साधन आहे. जसे वीणा, सतार, गिटार ची तार छेडणारा त्यातील सप्त स्वर अचूक जाणतो तसेच नाडी ची तार छेडणारा जाणकार वैद्य त्यातून उत्पन्न होणारे सर्व व्याधी जाणू शकतो. याबद्दल पुढील भागात सविस्तर माहिती घेऊ.



Share on

Like Now
Total Likes
109
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments