Fig

By Vaidya Harish Patankar  
378     111   0



1. अंजीर खाण्याचे काय फायदे होतात? कोणी कोणी ते खावे?

उत्तर- अंजीर हे पित्तशामक व रक्तवृद्धी करणारे आहे. अशक्त लोकांनी रोज सकाळी याचे सेवन केल्यास अंजिराच्या अंगी असणाऱ्या रक्तवृद्धी व रक्तशुद्धी च्या गुणधर्मामुळे त्यांचा अशक्तपणा लवकर दूर होतो. अंजिराच्या कच्च्या फळांची भाजी करतात ती जास्त रुचकर नसली तरी बाधक ही नाहीये. पिकलेल्या फळांचा मुरंबा करतात तोही बल्य व रक्तवर्धक आहे. शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या योगाने जेंव्हा जीभ व तोंड ही फुटतात तेंव्हा अंजिराच्या पानांची राख ओठांना घासली जाते. उत्तम फायदा होतो. अंजीर शीतल स्वादु व गुरू आहेत. याने रक्तदोष , दाह, वायु व पित्त शमन ही होते. सुके अंजीर सुद्धा उत्तम पोषक आहेत, पचनशक्ती उत्तम असल्यास रोज एक किंवा दोन सेवन करायला हरकत नाही.



Share on

Like Now
Total Likes
111
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments