Cardamom, Clove - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
403     104   0



1. उलटी , मळमळ यावर लवंग दातात धरल्यास फायदा होतो का?

उत्तर- आयुर्वेदात लावंगेचा उपयोग उलटी होणे, मळमळणे, अपचन होणे यात वर्णन केलेला आहेच. दात किंवा दाढ दुखत असल्यास देखील लवंग दातात धरतात. लवंग तिखट, कडवट , लघु, नेत्रास हितकारात, थंड, पाचक व रुची उत्पन्न करणारी आहे. पोट फुगणे, शूल, खोकला, श्वास , उचकी व क्षय रोगावर देखील गुणकारी आहे. लवंग चावून तिचा रस गिळल्याने सर्दी, कफ, रक्तपित्त यात देखील फायदा होतो. लावंगेचा तेल रुमालावर टाकून हुंगल्याने सर्दी दूर होते. पूर्वी रातांधळेपणा घालविण्यासाठी बकरीच्या मूत्रामध्ये लवंग उगाळून डोळ्यात घातली जात असे. डोकेदुखी मध्ये देखील लवंग दिली जाते. 


2. केळी खाऊन अपचन झाल्यास वेलची द्यावी असे का म्हणतात?

उत्तर- वेलची गरम आहे, अग्निदीपक आहे, दुष्ट कफाचा नाश करणारी व वतानुलोमक आहे. तर केळी कफवर्धक आहे. केळी मुळे जो अनावश्यक कफ वाढून अग्निमांद्य येते ते वेलची ने दूर होते. म्हणून केली सोबत नेहमी वेलची पूड खावी. तसेच केळीच्या शिकरणात देखील वेलची टाकतात. वेलची सुगंधी, हृदय, रुचकर, दीपक पाचक, वातशामक, उत्तेजक व दाह शामक आहे. वेलची रात्री खाऊ नये. त्यामुळे कोड होण्याची शक्यता असते. वेलचीचे अतिरिक्त सेवन केल्याने गर्भवती स्त्रियांना गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. वेलचीची मषी अर्थात राख मधातून चाट विलास उचकी लगेच थांबते. सर्दी कफ देखील कमी होतो. 


3. गुडघे दुखत असल्यास दालचिनी चा घरगुती उपयोग कसा करता येईल?

उत्तर- गुडघे दुखत असल्यास दालचिनी ची पावडर करून ती गुडघ्यावर लेप करावी. शिवाय दालचिनीचे तेल देखील गुडघ्याला चोळू शकता, तात्काळ आराम मिळेल. पित्ताच्या उलट्या होत असल्यास दालचिनीचा काढा प्यायला दिला जातो. दालचिनी, मिरे व आले एकत्र करून एक कप पाणी घेऊन काढा करून दिल्यास सर्दी खोकला तात्काळ कमी होतो. दालचिनी उष्ण, दीपक, पाचक, वात हारक , उत्तेजक, जंतुनाशक आहे. दातांमध्ये कीड पडल्यास दालचिनी दातात धरून ठेवावी किंवा कापसाचा बोळा करून दोन थेंब दालचिनी तेल टाकून तो रोज दातात धरून ठेवावा, दंत शूल देखील पटकन बरा होतो.



Share on

Like Now
Total Likes
104
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments