Udid Daal - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
278     118   0



प्रश्न :- १ उडीदाचे गुणधर्म काय आहेत ?

उत्तर :- उडीद हे भारतामध्ये सगळीकडे पिकणारे कडधान्य आहे. उडीद हे पौष्टिक असे कडधान्य आहे. तृप्तीदायक, बल वाढविणारे, वीर्य वाढविणारे हे उडीदाचे गुणधर्म आहेत. प्रसुता स्त्रियांसाठी अंगावरील दूध वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. उडीद हे जेवणातील रुची सुद्धा वाढवते. शरीरातील फिरता वायूला योग्य दिशा देणारे उडीद विशिष्ट पदार्थासह खाल्ल्यास पचनाला उपयुक्त आहे. पक्षाघातासारख्या आजारामध्ये उडीदाचा उपयोग होतो.


प्रश्न २ :- उडीदाचे पदार्थ पचनास जड असतात का?

उत्तर :- हो, उडीदाचे पदार्थ पचनास जड असतात. ज्यांची पचनशक्ती मंद आहे त्यांनी उडीद अधिक प्रमाणात खाऊ नयेत. परंतु उडीदाची डाळ पचण्यासाठी त्यामध्ये लसूण व हिंगाचा वापर केल्यास त्याचा उपयोग चांगला होतो. उडीद पापदासारखे पदार्थ हिंग घालून खाल्ले असता तोंडाला चव येण्यास मदत होते.उडीदाचे साखरेसह छोटे छोटे लाडू बनवून ते दुधासह खाल्ल्याने शक्ती प्राप्त होते. ज्यांना पोटफुगीचा त्रास आहे,त्यांनी उडीदाचे पदार्थ योग्य काळजी घेऊन खायला हरकत नाही.


प्रश्न ३ :- उडीद रोज खावेत का??

उत्तर :- उडीद हा पदार्थ रोज खाण्यायोग्य नाही. गुणधर्मात तो जड असल्याने पचायला अवघड आहे. परंतु थंडीमध्ये व वायुप्रकृती असण्याऱ्या व्यक्तीना हितकारक आहे. उडीद हा दिर्घपाकी असल्याकारणाने तो उशिरा पचतो. ज्यांना वाताचे आजार जसे पक्षाघात,अर्दीत इ. त्यांनी वैद्याच्या सल्ल्याने उडीद घ्यावेत. पुरुषांच्या लैंगिक समस्यांमध्ये सुद्धा उडीद वैद्यांच्या सल्ल्याने रोज घेतल्याने फायदा होतो. उडीद हे कफ व पित्त हे दोन दोष वाढविण्यास कारणीभूत असल्याने स्वस्थ व्यक्तीने ते रोज खाण्यास योग्य नाही. पाचनशक्तीचा विचार करून व वैद्यांच्या सल्ल्याने उडीद खावेत.



Share on

Like Now
Total Likes
118
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments