Honey - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
237     107   0



1. आपण खातो तो मध खरा आहे की खोटा आहे कसे ओळखावे?

उत्तर- खऱ्या मधाची परीक्षा अनेक प्रकारे घेता येते. जसे की मधात पडलेली माशी जर त्यातून बाहेर येऊ शकत असेल व उडून जाऊ शकत असेल तर मध खरा समजावा. अस्सल मधात कापसाची वात करून ती त्यात बुडवून पेटविल्यास आवाज न करता पेटत राहील. खरा मध कुत्रा खात नाही. अथवा तो लावून ठेवलेल्या पदार्थांना कुत्रा स्पर्श ही करत नाही. खऱ्या मधाचा थेंब पाण्यात टाकला असता तो तळाशी जाऊन बसतो. खऱ्या मध मातीत, चूर्णात मिसळत नाही. त्याचा एक थेंब शर्टवर घेतला तर तो घरंगळत खाली पडतो, कापडाला चिटकत नाही. मधात काकवी किंवा गुळाचे पाणी मिसळले असल्यास त्याची नैसर्गिक चव पण बदलते व थोडं प्रयत्न केल्यास या भेसळी नक्की ओळखता येतात. 


2. मधाचे गुणधर्म काय?

उत्तर- मधाचे गुण हे खऱ्या मधाचे सांगितले आहेत, बनवटी मधाचे नाहीत. मध हा लघु, मधुर कषाय, रुक्ष, नेत्रांना हितकर, कंठाला हितकर, अग्निप्रदीपक आहे. ताजा मध पुष्टीकारक, कफहाराक नसलेला व मलप्रवृत्ती कारक असतो तर जुना मध म्हणजे एक वर्ष होऊन गेलेला मध हा रुक्ष, मेद कमी करणारा, कफ कमी करणारा, मलावरोध नाहीसा करणारा असतो. पक्व मधाच्या पोळ्यातून काढलेला मध त्रिदोषहारक असतो तर अपक्व पोळ्यातील मध किंचित आंबट व त्रिदोष उत्पन्न करणारा असतो. मध काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीतच ठेवावा. पत्र्याच्या डब्यात ठेवल्यास मध काळा पडतो व उग्र वास येतो.


3. मधाला गरम का करु नये?

उत्तर- मध म्हणजे खरतर मध माशी ची उलटी आहे, फुलातून घेतलेल्या मकरंदात ती तिचे पित्त मिसळते, त्याचे पाचन करते व एक उत्तम पौष्टिक अन्न उलटी स्वरूपी बाहेर टाकून साठवून ठेवते. हा तसा शीतल आहे, अल्प उष्ण त्याच्या पित्तकारक , कफहारक गुणधर्मामुळे आहे. मधाला उष्णता सहन होत नाही, म्हणून मध गरम करू नये. एवढंच काय पण गरम पदार्थातही तो घालू नये अथवा त्यावर गरम पाणी पिवु नये. 


4. मध आणि तूप एकत्र का खाऊ नये?

उत्तर- मध आणि तूप समप्रमाणात एकत्र घेऊ नये. त्याने ते विष तुल्य बनतो पण शक्यतो सम प्रमाणात आपण मध घेत नाही, थोड्याफार विषम प्रमाणात तो एकत्र घेतला तरी चालतो. तो अनेक दिवस सम प्रमाणात घेतल्यास हळूहळू गर विष तयार होते, एकदोन वेळा घेतल्यास लगेच असा काही त्रास होत नाही.



Share on

Like Now
Total Likes
107
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments