Gram

By Vaidya Harish Patankar  
349     109   0




1. आयुर्वेदात हरभरा डाळीचे पदार्थ लगेच बंद करायला सांगतात, असे का? हरभरा, चणे खाऊ नयेत का?

उत्तर- असे काही नाही. हरभरा, चणे किंवा त्यापासून बनणारे बेसन पीठ व त्याचे पदार्थ उत्तरोत्तर अजून पौष्टिक आहेत, मात्र पचायला जड असल्याने आदीच पचनशक्ती कमी झालेल्या रुग्णांना बरे होईपर्यंत यांचे पथ्य पालन करण्यास सांगितले जाते. हरभरे थंड, रुक्ष, वायुकारक, व मलावष्टंभ निर्माण करणारे आहेत. कफ व पित्त विकारात यांचा फायदा होतो. सर्दी खोकला झाला तरी चणे भाजून खाल्ले की लगेच कमी होतो. भाजलेले चणे गरम, रुचकर व शरीराचे तेज वर्धक असतात, पौष्टिक असतात. हरभरा हा उत्तम वाजीकर आहे, शुक्र धातू व मैथुन शक्ती वर्धक आहे. स्त्रियांसाठी सुद्धा हरभरा अत्यंत पोषक आहे. याच्या सेवनाने पाठ, कंबर दुखी नाहीशी होते, थकवा जातो मात्र सांधेदुखी सुरू झाल्यास हा वातकारक असल्याने वर्ज्य आहे. प्राकृत अवस्थेत बलवर्धक तर पचनशक्ती कमी असल्यास अनेक रोग कारक असा हा हरभरा युक्तिपूर्वक वापरल्यास अनेक आजारांचा नाश करतो. हरभऱ्याची टरफले सुद्धा भाजून उचकी लागल्यावर मधात दिल्यास तात्काळ उचकी थांबते.


2. हरभऱ्याचे सेवन कोणी करू नये?

उत्तर- हरभरा हा अत्यंत वात प्रकोपक आहे. मलावष्टंभ निर्माण करणारा आहे, त्यामुळे अपचनाचा त्रास असलेले, पोट साफ होत नसलेले तसेच मूळव्याध व सांधेदुखी चा त्रास असलेल्यांनी हरभरा कोणत्याच प्रकारे सेवन करू नये. शिवाय हरभरा हा कोड झालेल्या व्यक्तींनी देखील खाऊ नये. याने कोड वाढतो. मुतखडा असलेल्या लोकांनी तर याचे बिलकुल सेवन करू नये. पाठ, कंबर , हाडे दुखत असल्यास सुद्धा याचे सेवन टाळावे. वजन वाढलेले, स्थूल व मधुमेह झालेले, रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढलेले यांनी सुद्धा याचे नियमित सेवन टाळावे.


3. हरभऱ्याची आंब पूर्वी औषधी म्हणून वापरायचे ते खरं आहे का? काय फायदा होतो ?

उत्तर- हरभऱ्याची आंब अम्ल रसात्मक असून उत्तम औषधी आहे. विंचवाच्या दंशावर हरभऱ्याची आंब लावल्यास विष उतरण्यास मदत होते. उन्हाळ्यात हीच आंब पाण्यात मिसळून थोडी प्यायल्यास शीतलता प्राप्त होते व उन्हाचा चटका लागत नाही, उन्हाळी लागत नाही. करपट ढेकर, उदरशूल, पोट फुगणे, अपचन आदी विकारात हरभऱ्याची आंब दोन थेंब बत्ताश्यावर टाकून चाटून खावी, याने पटकन आराम मिळतो. गळू लवकर पिकण्यासाठी सुद्धा पूर्वी हरभऱ्याची आंब त्यावर लावली जात असे. यामुळे गळू च्या आतील दूषित रक्त बाहेर पडायला मदत होत असे. हरभऱ्याची आंब मात्र सकाळी सकाळी गोळा करावी.



Share on

Like Now
Total Likes
109
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments