Sugar Apple

By Vaidya Harish Patankar  
339     109   0



1. लहान मुलांना सीताफळ दिल्यास सर्दी होते का?

उत्तर- सीताफळ हे खूप थंड गुणधर्माचे आहे. त्याच्या अधिक सेवनाने शैत्य उत्पन्न होते , म्हणूनच त्याचे नाव 'शीत फळ' अर्थात सीताफळ आहे. याच्या अधिक सेवनाने लहान मुलांना चटकन सर्दी होते. लहान मुले असेही कफारचीच असतात. त्यांना कफवर्धक फळे खाऊ घातल्यास त्यांचा कफ पटकन वाढून त्यांना सर्दी होते. मात्र लहान मुलांना सीताफळ खूप आवडते, सर्दी नसताना ते त्यांना जरूर द्यावे. सीताफळ अत्यंत बल्य, पौष्टिक , मांसपेशींना बळ देणारे, लहान मुलांना वाढीला मदत करणारे आहे. फलहारासाठी किंवा पूरक आहार म्हणून सुद्धा याचे सेवन केले जाते.


2. सीताफळाचे सेवन केल्यास हृदयाला फायदा होतो का?

उत्तर- हो, सीताफळ हे अत्यंत हृदय आहे. हृदयाच्या मांसपेशींना बल्य आहे. शरीरात आलेला थकवा, आजारपणामुळे आलेली क्षीणता याने पटकन जाते. ज्याचे हृदय दुर्बल असेल, ज्यांच्या हृदयाचे स्पंदन वाढत असेल, हृदयात घाबरल्याप्रमाणे वाटत असेल , हृदयाच्या मांसपेशी शिथिल झाल्या असतील त्यांच्यासाठी सीताफळ अत्यंत फायदेशीर आहे. सीताफळ हृदयाच्या मांसपेशींचे बळ वाढवून हृदयाची क्रिया सामान्य बनविते, स्पंदने वाढलेली जागेवर आणते. त्याचा स्वाद मधुर असल्याने, चव प्रिय असल्याने ते मनाला आनंद देऊन हृदय कार्य करते.


3. सीताफळ जास्त खाल्ल्यास काय त्रास होतो?

उत्तर- सीताफळ शीत, वृष्य, वातूळ आहे. तसेच ते उत्तम पित्तशामक, कफकारक, तृप्तीदायक, मांसवर्धक, बल्य व हृदय आहे. मात्र अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याच्या शीत गुणधर्मामुळे थंडी वाजून ताप येतो. सर्दी खोकला वाढतो व आजारपण मागे लागते. त्यामुळे सीताफळाचे अधिक प्रमाणात सेवन करू नये. 

4. आजकाल अनेक ठिकाणी सीताफळ रबडी खायला मिळते, ते योग्य आहे का?

उत्तर- सीताफळ रबडी ही अजून गुरु व शीत गुणांची बनते. त्यातच दूध आदी मिसळल्याने ती अजून पौष्टिक, गुरू, फ्रीज मध्ये ठेवल्याने अत्यंत शीत बनेते. श्रीखंड आदी प्रमाणे आहारीय पदार्थ म्हणून जरी उत्तम असली तरी पचनशक्ती उत्तम नसल्यास हानिकारक ठरते. सर्दी , कफ वाढविते. पचनशक्ती उत्तम असल्यास उत्तम बल्य, भूक भागविणारी, तृप्ती, आनंद देणारी ठरते.





Share on

Like Now
Total Likes
109
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments