Calabash

By Vaidya Harish Patankar  
325     116   0




1.दुधी भोपळ्याचा रस रोज सकाळी पिणे हृदयासाठी चांगले आहे का?

उत्तर- खरंतर दुधी भोपळाच काय पण कोणत्याच अश्या फळभाजी चा उगीच रस काढून किंवा वेगवेगळ्या फळभाज्या एकत्र करून सकाळी सकाळी उपाशी पोटी रस पिवू नये. असे रस पचायला जड असतात. लक्षात ठेवा फळांचा रस वेगळा आणि फळभाज्यांचा रस वेगळा. एकवेळ फळांचा रस चालेल जसे की मोसंबी, संत्री, अननस, सफरचंद, कलिंगड पण फळभाज्या म्हणजे कारली, दोडका, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ यांना न शिजवता कच्चा रस काढून पिल्यास तो अल्प प्रमाणात घेतला तरी तो पचायला जडच असतो. म्हणून या फळभाज्या शिजवूनच खाव्यात. त्यात दुधी भोपळा तर नावाप्रमाणे अगदी दुधासारखे पोषण तत्वे असणारा आहे. म्हणून तो निवडताना मस्त गोड दुधी भोपळा घ्यावा. कडू दुधी निवडल्यास त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर वाईटच होणार, म्हणूनतर अनेकांना दुधी भोपळ्याच्या रसाने विषबाधा झाली असे आपण ऐकतो, त्यांनी नेमका कडू भोपळा त्या दिवशी सेवन केलेला असतो. दुधी भोपळा हा स्वादिष्ट असतो, मधुर आहे, गुणकारी आहे, पचायला जड मात्र शक्तिवर्धक आहे. दुधी भोपळ्याचा हलवा सुद्धा करतात. दुधी हृदयास हितकारक, पित्त व कफनाशक, जड, वीर्यवर्धक, रुची उत्पन्न करणारा व धातू पुष्ट करणारा आहे. याच्या सेवनाने गर्भिणी स्त्री ला बळ मिळते, गर्भाचे पोषण होते, व गर्भावस्थेतील मलबद्धता दूर होते. मास्तकातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा दुधी च्या बियांचा वापर केला जातो. दुधीच्या पानाचा रस काढून मूळव्याधींवर चोळला असता कोंब गळून पडायला किंवा मूळव्याध बरी व्हायला मदत होते.



Share on

Like Now
Total Likes
116
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments