Millets seeds

By Vaidya Harish Patankar  
287     96   0



1. आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा का? बाजरीचे गुणधर्म काय?

उत्तर- बाजरी ही गव्हाईतकीच पौष्टिक आहे. पूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागात बाजरी हेच प्रमुख अन्न होत. बाजरी ची भाकरी व म्हशीचे दूध हे फारच पौष्टिक असते, बलवर्धक असते. तूप , लोणी लावलेली बाजरीची भाकरी खूप चविष्ट लागते. बाजरी उष्ण असल्याने ती पावसाळ्यात व हिवाळ्यात सेवन करावी, उन्हाळ्यात खाणे टाळावे. तसेच बाजरीची भाकरी खाल्ल्याने मलावरोध होतो, काहींना लगेच मूळव्याधीचा त्रास होतो, यांनी बाजरीची भाकरी खाणे टाळावे. बाजरीच्या पिठात गुळ व तूप घालून बाजरीचे उंडेही बनवले जातात. नागपंचमी च्या दिवशी बाजरीचे उंडे नागदेवाला वाहतात. कोवळ्या बाजरीचा हुरडा सुद्धा पौष्टिक व चविष्ट लागतो. बाजरी ही हृदयाला हितकारक, बलकारक, पचण्यास जड, अग्निदीपक, पचण्यास जड व पित्त प्रकोप करणारी आहे. रुक्ष असून स्त्रियांमध्ये कामभावना निर्माण करणारी आहे.



Share on

Like Now
Total Likes
96
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments