Kokam- Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
248     113   0



कोकम (आमसूल) १. आमसूल हे भाजीत वापरले जाते, त्याचा काय फायदा होतो?

उत्तर- आमसुलचा उपयोग अत्यंत प्राचीन काळापासून होत आहे. आमसूल चिंचेपेक्षा अधिक आरोग्यदायी आहे. आमसूल आंबट, उष्ण, वायूहारक, कफ वर्धक व पित्त कारक आहे. आमसूल पोषक व स्निग्ध देखील आहे. भाजीत टाकल्याने भाजी थोडी आंबट व चवदार बनते. पचायला हलकी होते. मूळव्याध, पोट दुखणे, पोटात मुरडा येणे यावर आमसुलचे पाणी किंवा कोकम सरबत करून प्यायला दिल्यास तात्काळ आराम मिळतो.


२. आमसुलच्या तुपाचा काय उपयोग होतो?

उत्तर- आमसुलाचा बी मधून तेल काढले जाते, ते मेणासारखा घट्ट व पांढऱ्या रंगाचे असते, त्याला 'आमसुलाचे तूप' असे म्हटले जाते. हे तूप औषधांसाठी तसेच खाण्यासाठी सुद्धा वापरले जाते. हिवाळ्यात थंडीमुळे जेंव्हा ओठ फुटतात किंवा हातापायांची त्वचा फाटून भेगा पडतात, पायाला टाचेला चिरा पडतात तेंव्हा आमसुलचे हे तूप लावावे, त्वचेचे थंडीपासून संरक्षण होते, शिवाय भेगा लवकर बऱ्या होतात. आमसुलाचे तेल मेणबत्ती बनविण्यासाठी किंवा वेगवेगळे मलम बनविण्यासाठी सुद्धा वापरले जाते.


३. कोकम सारबतचे काय फायदे होतात?

उत्तर- कोकम सरबत म्हणजेच आमसूल वापरून तयार केलेलं पाणी, सरबत. हे पोट दुखी, कृमी- जंत तसेच अतिसार सारख्या आजारात उत्तम लाभदायी आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये तहान जास्त लागत असल्यास थोडं साखर मीठ टाकून कोकम सरबत बनविले जाते. यामुळे तृष्णा लवकर शमन होते. शीतपित्ताच्या आजारात सुद्धा याचा खूप फायदा होतो.



Share on

Like Now
Total Likes
113
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments