Jaayphal - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
403     126   0



1. जायफळ आणि जायपत्री मध्ये काय फरक असतो? कोणते वापरावे?

उत्तर- जयफळाच्या झाडाला जेंव्हा मस्त गोल व लंबगोल फळे येतात तेंव्हा त्या फळातील आतल्या बी ला जायफळ म्हणतात तर वरील जाळीदार वेष्टनाला जायपत्री असे म्हणतात. या प्रकारे एकाच फळातून जायफळ व जायपत्री अशी दोन सुगंधी औषधे प्राप्त होतात. दोन्हीचे गुणधर्म जवळजवळ सारखेच असतात मात्र जायपत्री मध्ये विषघ्न गुण जास्त प्रमाणात आहेत. जयफळाच्या अनेक प्रकारातील हकले , पोकळ व भरडे जायफळ निकृष्ट समजावे तर मोठे, वजनदार व टणक जायफळ उत्तम प्रतीचे समजावे. जायफळ तुपात ठेवल्यास अनेक वर्षे टिकते. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांनी जायफळ नेहमी संग्रही ठेवावे. 


2.लहान मुलांच्या पोटात मुरडा आल्यास जायफळ उगाळून द्यावे का?

उत्तर- जायफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत गुणकारी औषध आहे. लहान मुलांच्या पोटात मुरडा आल्यास मधात उगाळून द्यावे. याने जुलाब सुद्धा थांबतात. जठराग्नी प्रदीप्त होतो, व मुलांना शांत झोप लागते. जायफळ आणि सुंठ गाईच्या तुपात उगाळून ते चाटण चाटविल्यास लहान मुलांना सर्दीने होणारे जुलाब थांबतात. 


3. जायफळ दुधात घेतल्याने काय फायदा होतो?

उत्तर- जायफळ हे उत्तेजक, बल्य व अग्नी प्रदीपक आहे. दुधात घेतल्याने दूध अधिक स्वादिष्ट बनते. वीर्यवर्धक व बल्य असल्याने पुरुषांची मैथुन क्षमता वाढते. कामामुळे आलेला थकवा दूर होऊन झोप शांत लागते. त्वचेला रंग उजळण्यास मदत करते. बाहेरून दुधात उगाळून त्वचेवरील वांग किंवा मुख पिटिकांचा काळ्या डागांवर लावल्यास ते डाग कमी होण्यासही मदत होते. दुधासोबत जायफळ हे निद्रानाश, दुर्बलता, वीर्याविकार, अतिसार, वातरोग , ग्रहणी, मूळव्याध अश्या अनेक आजारांवर लाभदायी ठरते.



Share on

Like Now
Total Likes
126
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments