Asafoetida( HING) - Ayurved Perseptive

By Vaidya Harish Patankar  
335     118   0



1. हिंग आयुर्वेदात व आहारात खूप वापरला जातो, त्याचे काय काय उपयोग होतात?

उत्तर- आहारात किंवा औषधात वापरण्यापूर्वी हिंग नेहमी भाजून अगर तळून शुद्ध केला जातो. हिंग हा उष्ण, पाचक, रुचिकारक, तीक्ष्ण तसेच वायू, कफ आणि शूल नाशक आहे. पोटात गोळा येणे, पोट फुगणे, जंत अथवा कृमी होणे यात हिंग फारच गुणकारक आहे. तात्काळ फायदा मिळण्यासाठी गरम पाण्यात चिमूटभर हिंग कालवून प्यायला देतात. हिंग डोळ्यांसाठी सुद्धा हितकारक आहे, अजीर्ण, अधोवायू व मलावरोध दूर करतो. गर्भाशयाला उत्तेजक आहे. कफदुर्गंधी नाशक असून फुफुसांच्या रोगात कफाला पातळ करून बाहेर काढतो व फुफ्फुसांना बळ देतो. भोजनात हिंगाचे सेवन केल्यास आतड्यांना बळ मिलते, अन्नाची चव वाढते. नियमित हिंग सेवन केल्यास अपचन होत नाही व पचन शक्ती उत्तम राहते.


2. शुद्ध व अशुद्ध हिंग कसा ओळखावा?

उत्तर- हिंग हा फेरूला फॉइटीडा नावाच्या झाडाच्या निघालेल्या रसापासून बनतो. तो आपल्याकडे इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बलुचिस्तान , काबूल आदी भागातून येतो. उत्तम प्रतीच्या हिंगाचा वास उग्र असतो. हिंगाचा तीव्र वासावरूनच त्याची किंमत ठरते. उत्तम प्रतीच्या हिंगाला 'हिरा हिंग' असे म्हणतात. तो चमकदार, उग्रगंधी, तीव्र, सुगंधी व थोडा लालसर पिवळ्या रंगाचा असतो. त्याला जाळला असता कापराप्रमाणे तो जळतो. आणि त्यातून सुगंधित धूर बाहेर पडतो. हा हिंग तिखट, तुरट व कडवट लागतो. शुद्ध हिंग पाण्यात मिसळल्याने पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र बनते, जर हिंगात भेसळ असेल तर तो तळाशी खाली चिकटून बसतो. अशुद्ध हिंग फारसा उपयुक्त नसतो.


 3. पोटदुखी, दाढ दुखी वर हिंग कसा देतात? अजून काय फायदा होतो?

उत्तर- पोट दुखत असल्यास हिंग नाभी प्रदेशी लावावा, तसेच कोमट पाण्यात दोन चिमूट भाजलेला हिंग टाकून ते पाणी प्यायला द्यावे, पोटदुखी तात्काळ थांबते. पोटात कृमी असल्यास, अजीर्ण अथवा कृमीमुळे पोट दुखत असल्यास आयुर्वेदात सांगितलेले हिंग्वाष्टक चूर्ण कोमट पाणी किंवा तुपासह खायला द्यावे, तात्काळ आराम मिळतो. दाढ दुखत असल्यास हिंग दुखाणाऱ्या दाढेत भरावा व वरून कापसाचा बोळा लावून दाढ घट्ट आवळून धरावी, तात्काळ दाढ दुखी थांबते. तसेच डोके दुखत असल्यास किंवा मूत्रावरोध झाला असल्यास बडीशेपेच्या अर्कामध्ये हिंग टाकून दिल्यास तात्काळ आराम मिळतो.



Share on

Like Now
Total Likes
118
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments