Tea - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
279     111   0



1. चहा पिण्याचे काही फायदे होतात का?

उत्तर- चहा हे आजकालचे घरोघरी पिले जाणारे आवडते पेय असले तरी ते प्रणातच प्यावे. चहा हे आळस घालवितो, बुद्धीला उत्तेजना देतो. त्यामुळे बुद्धिजीवी वर्गाचे, अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे आवडते पेय असते. मात्र याच व्यसन लागल्यास यातुन बाहेर पडणे अवघड असते. चहा जठरास जागृत करतो, रुची उत्पन्न करतो, लघवीला साफ करतो, अनेक जणांना चहा घेतल्याशिवाय शौचास साफ होत नाही. चहा मनुष्याचा थकवा दूर करतो. जेवणानंतर तीन चार तासांनी चहा प्यावा. चहा हा पित्तकारक आहे, त्यामुळे जेवणानंतर तीन चार तासानंतर घेतल्यास अन्नाचा काही भाग अपाचित राहिला असल्यास त्याचे पाचन चांगले होते. चहाची पाने चवीला तुरट, तीक्ष्ण व विपाकाने कटू असतात, उष्ण वीर्य असल्याने चहा कफहाराक, वातवर्धक व आमाशयास बल्य आहे. दुधात केलेला चहा मधुर, कफघ्न, काहीसा स्वेदल, उत्तेजक, कामोत्तेजक, थंडी घालविणारा, श्रम परिहार करणारा, तरतरी आणणारा, ताप, डोकेदुखी, खोकला , सर्दी घालविणारा व तात्काळ आनंद देणारा आहे. श्रम करणाऱ्या लोकांनी चहा प्यायल्यावर स्फूर्ती येते.


2. चहा चे व्यसन लागल्यास काय करावे?

उत्तर- चहा चे व्यसन शरीराला नुकसान कारक असते. चहा जास्त प्यायल्यास अनेक पचनशक्ती चे आजार होतात. पचन प्रक्रिया मंद होते. विकृत पित्त वाढू लागते, डोके दुखी वाढते, मळमळते, उलटी झाल्यावरच बरे वाटते, झोप लागत नाही, निद्रानाशाचा त्रास जाणवू लागतो, रक्तदाब वाढू लागतो, चहा न मिळाल्यास व्यसन लागलेला व्यक्ती चिडचिड करू लागतो, त्याचे डोके जड होते, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, त्याला चहा च्या वेळेला चहा लागतोच एखाद्या दारू साठी तडफणाऱ्या व्यक्ती सारखी त्याची अवस्था होते, हा चहा साठी तडफु लागतो, चहा ची तलफ लागते, जी त्याला चहा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. चहा ने जणू मज्जा तंतूंवर ताबा मिळवलेला असतो. चहा मिळेपर्यंत व्यक्ती बेचैन होतो. चहा चे व्यसन कमी करावयाचे असल्यास आदी हळूहळू कमी पावडर व जास्त दूध टाकलेला चहा घ्यायला सुरुवात करावी, नंतर चहा पावडर ऐवजी पेरू ची पाने, तुळस , गवती चहा, आलं, सुंठ घालून चहा घ्यायला सुरुवात करावी म्हणजे चहा चे व्यसन सुटते व त्रास ही होत नाही. चहा चे व्यसन सोडवायला कॉफी पिणे सुरू करू नये, ते अजून शरीराला घातक ठरू शकते.


3. लहान मुलांना चहा द्यावा का?

उत्तर- चहा मध्ये कॅफिन व टॅनिन ही रासायनिक द्रव्ये असतात. चहा मध्ये कॅफिन अधिक असते, ते शरीरात लवकर शोषले जाते. ते मूत्रल, नाडीसंस्थेला उत्तेजक व मांस पेशीला शक्ती देणारे असते. लहान मुलांना रोज एकदाच भरपूर दूध टाकलेला चहा दिल्यास तो त्यांना बुद्धिवर्धक व बल वर्धकच होतो, शिवाय सर्दी, ताप खोकला मध्येही तो लवकर बरा करायला मदत करतो. चहा कफघ्न आहे, पित्तवर्धक आहे. त्यामुळे लहान मुलांना अल्प प्रमाणात घेण्यास हरकत नाही मात्र तरुण व पित्त प्रकृतीच्या लोकांनी चहा चे अधिक सेवन करू नये, रिकाम्या पोटी चहा पिवू नये तसेच पोहे व चहा घेऊ नये.



Share on

Like Now
Total Likes
111
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments