Fennel - Ayurved Perseptive

By Vaidya Harish Patankar  
527     129   0



1. जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय योग्य आहे का?

उत्तर- एक महिला रुग्णा चिकित्सलयात पाळीच्या वेळी अंगावरून अधिक जात म्हणून येत होती, अनेक उपचार करून बरं वाटत नव्हतं, म्हणून परत कारण शोधाव म्हणून काही प्रश्न विचारले तर तिला रोज जेवणानंतर भरपूर बडीशेप खाण्याची सवय होती हा हेतू मिळाला. त्यानुसार चिकित्सा केली तेंव्हा लवकर उपशय मिळाला. पूर्वी पाळी ला त्रास होत असल्यास अथवा बाळंतिणीला बडीशेप व बाळंत शेप काढा करून देत असत, याने गर्भाशय शुद्धी होऊन पाळीला स्त्राव चांगला होत असे, म्हणून गर्भाशयावर काम करणारी अशी ही बडीशेप स्त्रियांनी तरी अल्प प्रमाणातच खावी. ती लघु, पित्तकारक, अग्निप्रदीपक व रुचिकर आहे. वृष्य आहे, गर्भाशयाला बळ देणारी आहे.


 2. लहान मुलांना बडीशेपेचा अर्क दिल्यास पोट दुखी थांबते का?

उत्तर- हो. बडीशेपेचा अर्क अत्यंत गुणकारी आहे, मधुर रसात्मक आहे. म्हणून तर संस्कृत मध्ये बडीशेपेला 'मधुरी' हे नाव पडले आहे. लहान मुलांमध्ये पोटात मुरडा आला असल्यास, पोट दुखत असल्यास, उलटी, जुलाब होत असल्यास, थकवा जाणवत असल्यास बडीशेपेचा अर्क दिल्यास तात्काळ आराम मिळतो. त्याचप्रमाणे ज्या मुलांच्या मागे खाण्यासाठी लागव लागत, ज्यांना फार भूक लागत नाही, अन्न पचन होत नाही त्या मुलांना रोज चार चार थेंब बडीशेपेचा अर्क सुरू करावा. हा उत्तम कृमीघ्न, अग्निदीपक व पाचक पण आहे. तसेच नेत्र्य असल्याने डोळ्यांसाठी देखील हितकर आहे.


 3. सर्दी खोकला झाला असता बडीशेप घेतल्यास काय फायदा होतो?

उत्तर- बडीशेप ही अल्प उष्ण, तीक्ष्ण, पित्तकारक व कफ सारक आहे. अग्निदीपन करते, श्लेष्मल कलेत कफ साठला असता त्यास अलगत आपल्या कफशामक गुणधर्माने बाहेर काढायला व फुफ्फुसांना बळ द्यायला बडीशेप उत्तम ठरते. लहान मुलांना पूर्वी छातीत कफ साठल्यास ओवा व बडीशेप ची पुरचुंडी तयार करून ती तव्यावर भाजून हलक्या हाताने लहान मुलांची छाती, पोट व पाठ शेकली जायी, शिवाय त्यांना हळुवार नाकाजवळ घेऊन ती हुंगायला दिली जायी, अगदी एक दोन दिवसांच्या बाळाला देखील हा उपचार करता येतो, किंवा आईने ओवा व बडीशेप चावून बाळाच्या तोंडात फुंकर मारावी तरी सुद्धा त्याच्या उडनशील तत्वांमुळे त्या बाळाला तेवढं सुद्धा औषध म्हणून परेस होत आणि त्याची सर्दी कमी होते, खोकला जातो. छाती हलकी होते, छातीत साठलेला कफ कमी होतो. आराम मिळतो, मुलांना झोप शांत लागते.



Share on

Like Now
Total Likes
129
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments