28 April 2022
Cucumber - Ayurved Perspective
By Vaidya Harish Patankar341 162 0
1. उन्हाळ्यात काकडीची कोशिंबीर रोज खाल्ली तर चालते का?
उत्तर- हो, काकडी चे काप, कोशिंबीर, रायते व सांगडे असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. काकडीच्या बी च्या गराचा औषधांसाठी उपयोग केला जातो. गहू, ज्वारी, मका, तूर, मूग , उडीद आदी पचायला जड अन्न सेवन केल्यास काकडी चा हमखास उपयोग पाचन हलके होण्यासाठी आहारात कोशिंबीर च्या रुपात केला जातो. पुरणपोळी पचवायला काकडी खूप मोलाचे काम करते. पुरण बनवताना सुद्धा शेजारी काकडी चिरत बसल्यास पुरण नीट बनत नाही. काकडी चे लहान लहान तुकडे करून त्यात खडीसाखर घालून खाल्ल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. लघवीची जळजळ कमी होते. शास्त्रीय दृष्टीने काकडी शीतल, पाचक व मूत्रल आहे. पूर्वी काकडीचा व कांद्याचा रस एकत्र करून दारू प्यायलेल्या माणसाची दारू उतरविण्यासाठी देत असत.
Comments
No Comments
Latest Posts
-
Urine......
( 3 years ago) -
Vaman, Virechan......
( 3 years ago)