Difference between Tea and Coffee
By Vaidya Harish Patankar405 142 0
1. कॉफी आणि चहा मध्ये काय फरक आहे?
उत्तर- चहा आणि कॉफी ही दोन्ही पेये वेगवेगळी असली तरी त्यात बरीच वैशिष्ट्ये ही जवळजवळ सारखीच आहेत. तरीही चहा पेक्षा कॉफी नेहमीच जास्त हानिकारक आहे. पण लोक तरीही जास्त कॉफी लाच पसंद करतात. जणूकाही श्रीमंत लोकांमध्ये कॉफी तर सामान्य लोक चहा पसंद करत असतात. कॉफी चे काही गुण मात्र चहा पेक्षा हानिकारक आहेत.
2. कॉफी जास्त पिल्यास काय परिणाम होतात?
उत्तर- कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, स्फूर्ती येते. थंड प्रदेशात कॉफी जास्त पिली जाते, याने थंडी पासून माणसाचे संरक्षण होते. कॉफी प्यायल्याने सुस्ती व आळस दूर होतो. शरीरातील ज्ञान व मज्जा तंतूंना उत्तेजना मिळते. मेंदूला आलेला थकवा नाहीसा होतो. खडबडून जाग येते, लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्र पाळी करणारे अनेक जण लवकर झोप लागू नये म्हणून तर रात्री अभ्यास करणारी मुले सुद्धा रात्री कॉफी पिणे पसंद करतात. मात्र रोज रोज कॉफी पिल्यास फायदे कमी व तोटे च जास्त होऊ शकतात. कॉफी मूत्रल आहे, पचनशक्ती बिघडविणारी आहे, जास्त घेतल्यास मालावष्टंम्भ होतो.
3. कॉफी च्या बिया भाजून मुखशुद्धी म्हणून खातात का?
उत्तर- हो, अनेक जण भोजनोत्तर मुखशुद्धी म्हणून कॉफी च्या बिया भाजून खातात. कॉफी च्या बिया भाजल्यावर त्यामध्ये एकप्रकारचा सुगंध निर्माण होतो. कॉफी मध्ये चकोरी मिसळली जाते, अनेक कॉफी पिणारे लोक अशी मिश्र कॉफी पिणेच अधिक पसंद करतात. हे लोक जेवणानंतर सुपारी ऐवजी कॉफी च्या बिया भाजून मुखवास म्हणून तोंडात टाकत असतात. कॉफीच्या बियांमुळे तोंडाला उष्णता प्राप्त होते. अल्प प्रमाणात घेतल्यास पित्त स्त्राव वाढून अन्न पाचन व्हायला मदत होते मात्र त्यातील कडू रसामुळे पचनशक्ती बिघडून मालावष्टंम्भ निर्माण होतो. कॉफी च्या बिया शेकल्याने सुगंधित व चविष्ट होतात.
Comments
Latest Posts
-
Urine......
( 3 years ago) -
Vaman, Virechan......
( 3 years ago)