Dry Fruits

By Vaidya Harish Patankar  
235     103   0



1. सुकामेवा म्हणून पिस्ता खाल्ला जातो, त्याचे प्रमाण रोज किती असावे व त्याचा काय फायदा होतो?

उत्तर- पिस्ते मधुर व स्वादिष्ट लागतात. ते बलदायक व पुष्टीकारक असतात. पिस्त्याचे तेल डोक्याला चोळल्यास पित्त शमन होते. केश्य कार्य घडते. पिस्ते पचायला जड असतात त्यामुळे त्याचे अधिक प्रमाणात सेवन करू नये. ते वीर्यवर्धक, रक्त शुद्धी करणारे, पित्ताला भेदक व मलाला सारक आहेत. त्रिदोष नाशक आहेत. तूप व पिस्ते गाईच्या दुधासह सेवन केल्यास मेंदू ची दुर्बलता नाहीशी होते, स्मरणशक्ती सुधारते. शिवाय वीर्य वाढून मैथुन सामर्थ्य देखील वाढते.


2. मिठाईत चारोळी वापरली जाते, तिचे गुणधर्म काय?

उत्तर- चारोळी स्वादाने मधुर असते. पित्त, कफ व रक्तदोष दूर करते. पचायला जड, स्निग्ध व मलाला सारक आहे. ती शीत असल्याने ताप, दाह, पित्त यांचे शमन करते. तृष्णा घालावीते. मिठाईत वापरल्याने मिठाई अजून चविष्ट, मधुर, शीत व वीर्यवर्धक बनते.



Share on

Like Now
Total Likes
103
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments