Black Pepper - Ayurved Persepctive

By Vaidya Harish Patankar  
234     120   0



 १. काळे व पांढरे मिरे बाजारात मिळते यात काय फरक आहे?

उत्तर- मिरे हा मसाल्याच्या डब्यातील स्त्रियांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. काळे आणि पांढरे मिरे असे मिऱ्यांचे दोन प्रकार आहेत. अर्धवट पिकलेले मिरे वाळवले की ते काळ्या रंगाचे होते. हे काळेभोर मिरे बाजारात विकले जातात. मिरे पिकल्यानंतर त्याची टरफले आपोआप निघून जातात व पांढरे बनतात त्या मिऱ्यांना सफेद मिरे किंवा पांढरे मिरे असे म्हणतात. मिरे पूर्ण पिकल्यावर त्याचा तिखटपणा कमी होतो व त्यांना एक चांगला स्वाद येतो. पांढरे मिरे जास्त उष्ण किंवा शीत नाहीत, काळ्या मिऱ्यापेक्षा पांढरे मिरे गुणांनी श्रेष्ठ असतात.


2. मिऱ्यांचे गुणधर्म काय? यांचा उपयोग कसा करावा?

उत्तर- पांढरे मिरे दृष्टीचा कमजोर पणा दूर करतात. ते मस्तकासाठी पोषक व चक्षुष्य समजले जातात. पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थांत व पापडामध्ये पांढरे मिरे वापरले जातात. तसेच नेत्ररोगात अंजन म्हणून पण यांचा वापर केला जातो. सर्दी मध्ये सुंठ पेक्षा मिरे अधिक चांगले काम करतात. सतत सर्दी असणाऱ्या मुलांना किंवा रुग्णांना दुधात मिरे उकळून रोज प्यायला द्यावे. कायमची सर्दी बरी होते. मिरे सर्दी, खोकला किंवा कफाचा आजारात खूप फायदेशीर आहेत.


 3. वेगवेगळ्या आजारात मिरे घरगुती औषध म्हणून कसे वापरावेत?

उत्तर- मिरे कटू रस, कटू विपाक व उष्ण वीर्याचे आहेत. अग्निदीपक व कृमीघ्न आहेत. कफ व वात कमी करणारे आणि जास्त झाल्यास पित्त वाढविणारे आहेत. नाकातून रक्त पडत असल्यास, घोळणा फुटल्यास दही व जुन्या गुळात मिरे घालून खायला द्यावे, नाकातून रक्त पडणे तात्काळ थांबते. अंगावर शीतपित्ताच्या गाठी उठल्या असल्यास मिऱ्यांचे चूर्ण तुपाबरोबर चाटवावे तसेच मिरे वाटून त्या ठिकाणी लेप करावा म्हणजे तात्काळ आराम मिळतो. पोट दुखत असल्यास आले व लिंबाच्या रसात मिरे उगाळून किंवा त्यावर मिरे पूड टाकून चाटण द्यावे. चक्कर येत असल्यास मिरे, साखर, तूप एकत्र चाटण द्यावे तसेच पांढरे मिरे पाण्यात उगाळून रांजणवाडी वर लेप केल्यास रांजणवाडी लवकर पिकून फुटून बरी होते. असे हे बहुगुणी मिरे अनेक आजारांत वापरता येते.



Share on

Like Now
Total Likes
120
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments