Banana- Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
332     121   0



1. केळी अधिक प्रमाणात खाल्ल्यास कफ वाढतो का?

उत्तर- हो , केळी ही कफवर्धक आहेत, अधिक प्रमाणात सेवन केल्यास कफ वाढतो. विशेषतः कफ प्रकृतीच्या लोकांनी केळी चे रोज सेवन करू नये. तसेच सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्या लहान मुलांना देखील रोज रोज केळी खायला देऊ नयेत. केळी कफवर्धक असली तरी आरोग्यास अत्यंत हितकर, शरीराचे बृहण करणारी, बल्य व पोषक आहेत. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी, व्यायाम करणाऱ्यांसाठी, कष्टाची कामे करणाऱ्यांसाठी केळी सेवन हा उत्तम बालदायी आहार आहे. 


२. केळीचे शिकरण खाल्ल्यास त्वचारोग होतात का?

उत्तर- केळीचे शिकरण हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात आवडता प्रकार आहे. शिकरण खाल्लं आणि लगेच त्वचारोग झाला असे काही होत नाही. आयुर्वेदानुसार दूध व केळी हा विरुद्ध आहार आहे. त्यामुळे शरीरातील अन्नवह व रसवह स्रोतसाची दुष्टी होते व त्वचा बिघडू लागते, शरीरात कफ व क्लेद साठायला लागतो आणि त्यामुळे त्वचा रोग उत्पन्न होतात. शिवाय केळी ही मधुर रसात्मक असल्याने व त्यांच्या क्लेदकर गुणधर्मामुळे त्या कृमीकर बनतात व त्वचारोगांमध्ये कृमी हे सर्वात प्रमुख कारण असते. अनेक फंगल इन्फेक्शन व सोरिअसिस सारखे आजार असलेल्या लोकांनी त्यामुळे केळी शिकरण खाणे टाळलेलेच बरे. 


3. मूत्रविकारात किंवा पोटाच्या आजारांत केळीचा वापर करतात का?

उत्तर- हो, पोटाच्या आजारात रुग्णास फक्त केळी चे पथ्य दिल्यास अनेकदा त्याची पाचन प्रक्रिया सुधारते, मल बांधून होऊ लागतो, पोट साफ होते, पोट दुखी थांबते व अनेक दिवसांचा पचनाचा आजार बरा होतो. त्याचबरोबर जर रुग्णाला मुतखडा असेल, मूत्र थेंब थेंब पडत असेल तर पिकलेली केळी व आवळ्याचे चूर्ण एकत्र करून थोडं थोडं सेवन करावे, याने मूत्र विकार बरे होतात.



Share on

Like Now
Total Likes
121
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments